रोगावर नियंत्रण मिळावे म्हणून केली फवारणी, मात्र झाले उलट संजय जाधव
ऍग्रो वन

रोगावर नियंत्रण मिळावे म्हणून केली फवारणी, मात्र झाले उलट

अपंग शेतकरी हवालदिल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव

बुलढाणा - यावर्षी उशिरा का होईना पिका पुरता चांगला पाऊस Rain झाल्याने बुलढाणा Buldhana जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी Farmer सोयाबीन Soyabean पिकांची पेरणी केली पिकहि चांगले आले. परंतु सोयाबीन पिकावर खोंड अळी पडल्याने शेतकरी अडचणीत आला व त्यांमुळे किटकनाशक औषधि घेऊन फवारणी करीत आहे.

अशातच बुलढाणा तालुक्यातील साखळी खुर्द येथील शेतकऱ्याने कितकनाशक औषध घेऊन फवारणी केली असता सर्व उभे सोयाबीन पिक जळून गेले आहे. त्यांमुळे अपंग शेतकरी हवालदिल झाला आहे.

हे देखील पहा -

साखळी खुर्द गावातील प्रदीप भागाजी हिवाळे हे अपंग शेतकरी आहे यांच्यकडे साडेतीन एक्कर कोरडवाहू शेती आहे. या शेतात त्यांनी गावातील सावकारांकडून ३० हजार रुपये व्याजाने पैसे घेऊन शेतात सोयाबीन पिक पेरले. या शेताच्याच भरोश्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. २० ते २२ दिवसात पिक शेतात चांगले बहारदार दिसायला लागले होते. त्यातच सोयाबीन पिकावर खोंड अळीने आक्रमण केले म्हणुन अपंग शेतकरी प्रदीप हिवाळे यांनी गावातीलच शाश्वत कृषि सेवा केंद्रातून किटकनाशक औषध घेऊन सोयाबीन पिकावर फवारणी केली.

मात्र या औषधाचा उलटा परिणाम झाला व उभे सोयाबीन पिक जळून खाक व्हायला लागले, पिक उध्वस्त होत असल्याचे पाहुन कुटुंब हादरले व कृषि सेवा केंद्र धारकाला शेतात नेऊन दाखवले त्याने ज्या कंपनीचे औषध होते त्या कंपनिला कळविले तसेच प्रदीप हिवाळे यांनी कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ शेताची पाहणी सुद्धा केली. आता अपंग शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतात पाहणी करतांना शेतकऱ्याने हंबरडा फोडला, ढसाढसा रडायला लागले.

मायबाप सरकारने तातडीने आम्हाला आर्थिक मदत करावी अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही व संबधित कृषि सेवा केंद्रावर कारवाई करुण त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.

साखळी या गावातील शाश्वत कृषि सेवा केंद्र या दुकानातून घेतलेले कीटनाशक औषध इतर शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर सुद्धा तेच औषध फवारले असून काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पिवळी पडत चालली असल्याचे आरोप करण्यात आले आहे. साखळी शिवारातील असंख्य शेतकऱ्यांनी तोंडी तक्रारी या कृषि केंद्रविरोधात कृषि विभागाककडे केलेल्या आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anganwadi Workers Payment : अंगणवाडी सेविकांची भाऊबीज हुकली, अंगणवाडी सेविकांचे पालिकेकडे साकडं; कधीपर्यंत मिळणार पगार?

Balushahi Recipe: भाऊबीज स्पेशल मिठाई, घरच्या घरी तयार करा हलवाईसारखी गोड बालुशाही, वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

लाडक्या बहिणींना भाऊबीज कधी मिळणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्वाची अपडेट

Morning symptom of cancer: सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिलं दिसतं कॅन्सरचं हे लक्षण; 99% लोकं करतात इग्नोर

Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला बायकोने नवऱ्याला का ओवाळावे? जाणून घ्या जुनं शास्त्र

SCROLL FOR NEXT