Soyabean
Soyabean 
ऍग्रो वन

सोयाबीनच्या भावाने ओलांडला सात हजारांचा टप्पा; आजपर्यंतचा उच्चांकी दर

जयेश गावंडे

अकोला : गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनच्या Soybeans दरातील तेजी कायम आहे. शासनाने Maharashtara सोयाबीनला जेमतेम ३८८० रुपये प्रती क्विंटल दर घोषित केले असताना, आज अकोल्यातील बाजारात सोयाबीनच्या दराने प्रति क्विंटल ७ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. The soybean rates crossed the seven thousand mark 

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या अकोला Akola कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोयाबीनला Soyabean प्रती क्विंटल ७ हजार १०० रुपये दर मिळाला असल्याने हा आतापर्यंतचा सर्वाधिक दर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना Farmers दिलासा मिळाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात सोयाबीन काढणीवर असतानाच अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसल्याने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

उत्पादनातही घट आली. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. त्यात सुरुवातीच्या काळात बाजार समित्यांत Market Committee अल्पदराने सोयाबीनची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, ब्राझील, अमेरिकेसारख्या सोयाबीन उत्पादक देशातही या शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट आली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाली. चीनकडूनही China सोयाबीनची मागणी होत असल्याने देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली. याचा परिणाम विदभार्तील बाजारात दिसून येऊ लागला आहे.  

अकोला Akola जिल्ह्यातील बाजारातही सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला असून, ७ हजार १०० रुपयापर्यंत पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दराने ६ हजारी ओलांडली होती. आज थेट ७ हजाराचा टप्पा पार केला आहे. आज अकोला बाजार समितीत सोयाबीनची १५६१ क्विंटल आवक झाली आहे. सोयाबीनला सरासरी ६७०० रुपये दर मिळाला तर, कमीत कमी ६२०० रुपये दर मिळाला तर, जास्तीत जास्त ७ हजार १०० रुपये इतका आज पर्यन्तचा उच्चांकी दर मिळाला आहे. The soybean rates crossed the seven thousand mark 

वाढत्या भावाचा फायदा कुणाला--
सोयाबीनला आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन आजपर्यंतचा उच्चांकी दर मिळाला असला तरी या वाढत्या दराचा फायदा कुणाला असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात आपल्या कडील सोयाबीन विकले आहे. जवळपास 90 टक्केच्या वर शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन बाजार समितीत विकले असल्याची माहिती आहे त्यामुळे आजच्या सर्वाधिक दराचा फायदा व्यापाऱ्यांना की शेतकऱ्यांना हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

Vivo V30e 5G भारतात लॉन्च; 50MP फ्रंट कॅमेऱ्यासह मोबाईलमध्ये आहेत अनोखे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Today's Marathi News Live : मंदा म्हात्रे यांनी थेट राजीनामा नाट्यावर केला मोठा खुलासा

Maharashtra Election: नाशिक लोकसभा मतदारसंघात अवघ्या २४ तासात नवा ट्वीस्ट; समता परिषदेने घेतली नवी भूमिका

Benifits of Guar: अनेकांना नापसंत असणारी गवार आरोग्यासाठी आहे फायदेशीर

SCROLL FOR NEXT