भर पावसात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!  गजानन भोयर
ऍग्रो वन

भर पावसात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

सोयाबीन ला सरसकट 10 हजार रुपये दर मिळावा.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : सोयाबीनचा Soybean हंगाम जवळ आला आणि सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले जवळपास दहा हजारावर असणारा दर पाच हजारांवर आल्यामुळे सर्व सोयाबीन उत्पादक अत्यंत निराश झाले आहेत आणि त्यांच मोठ नुकसान ही या पडलेल्या दरांमुळे होणार आहे.(Soybean growers march on Collector's office)

हे देखील पहा -

सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन ला सरसकट 10 हजार रुपये दर मिळावा शिवाय हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, जिल्ह्यात ओला दुष्काळ Wet drought जाहीर करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत करावी या प्रमुख मागण्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी वाशिम Washim जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं रस्त्यावर उतरून मोर्चा काढण्यात आला होता.

स्थानिक शिवाजी चौकातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे जोरदार पावसात ही आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT