Ahmednagar Jayakwadi Dam Saam tv
ऍग्रो वन

Ahmednagar News: जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध; नाशिक, नगरमधून पाणीप्रश्न पेटणार

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा (Ahmednagar) निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नेत्यांसह शेतकरी आक्रमक झाले आहेत. धरणातून जायकवाडीत पाणी सोडले तर नगर, (Nashik) नाशिकमधील शेतकरी उध्वस्त होणार असल्याचे शिंदे गटाचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हंटले पाणी सोडण्यास विरोध केला. (Tajya Batmya)

अहमदनगर व नाशिकमधील धरणांतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आधार घेत देण्यात आला आहे. जवळपास साडेआठ टिएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याने नगर, नाशिकमधील शेतकरी संकटात सापडणार आहेत. एकीकडे निळवंडे धरणातून दुष्काळग्रस्त भागात सोडले. हे पाणी अनेक गावात पोहचलेच नाही. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी (Jayakwadi Dam) जायकवाडीला पाणी सोडणार असल्याने हवालदिल झाले आहेत. आज खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत बैठक घेतली आणि पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकत्र येऊन लढा देण्याची गरज 
२००५ साली झालेला कायदा आज नगर, नाशिकवर अन्याय करणारा आहे. इथल्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून ह्यासाठी लढा देण्याची गरज असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT