परभणी कृषी विद्यापिठाचे अधिकारी बांधावर 
ऍग्रो वन

परभणी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ नांदेडच्या बांधावर

सोयाबीन, कापूस पिकावरील किड व रोगाची पाहणी केली. तसेच निरीक्षणे नोंदवण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

नांदेड : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर व डॉ. मिलिंद सोनकांबळे यांनी कंधार तालुक्यातील शिवारात भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांना कीड- रोगासंदर्भात मार्गदर्शन केले. पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प ( क्रॉपसॅप ) अंतर्गत कंधार तालुक्यातील कंधार, बाळंतवाडी, गुलाबवाडी, घोडज, गंगणबीड, बाभुळगाव आदी गावांना शास्त्रज्ञांनी भेटी दिल्या. Scientis -from -Parbhani- Agricultural- University- on Nanded- farm

यावेळी त्यांनी सोयाबीन, कापूस पिकावरील किड व रोगाची पाहणी केली. तसेच निरीक्षणे नोंदवण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले. पिकावरील किडींची ओळख करावयाच्या उपाययोजना याबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी कंधार तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक विनोद पुलकुंडवार, संगणक चालक बालाजी गोरपल्ले, कृषी सेविका श्रीमती केंद्रे आदी उपस्थिती होती.

हेही वाचा - पर्यावरण संवर्धनासाठी व शेतकर्‍यांना उत्पादनाचे साधन म्हणून बांबूची लागवड कमीत कमी १० टक्के क्षेत्रावर करावी

पिकावरील किड व रोगाची तीव्रता पाहण्यासाठी कापूस, सोयाबीन, तूर पिकात कामगंध सापळे लावले जात आहेत. त्याद्वारे किडींची आर्थिक नुकसानीची पातळी अभ्यासून उपाययोजना सुचविल्या जाणार आहेत. तालुक्यातील गंगणबीड, बाभुळगाव या गावातील भाजीपाला तसेच पपई उत्पादक शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. मुग, उडीद या पिकावर मावा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रोगर १० मिली अधिक पाण्यात विरघळणारे गंधक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सोयाबीन पिकांवरील चक्रीभुंगा, खोडकिडा, उंटअळी या किडींच्या नियंत्रणासाठी थायोमिथॉक्झाम अधीक लॅमडा सायलोहिथ्रीन तिन मिली किंवा प्रोफेनोफोस अधीक सायपरमेथ्रीन २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकाचे शेंड्याकडील पाने पिवळी पडत असल्यास त्यासाठी सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड दोन ५० मिली अधिक १९: १९: १९ हे विद्राव्य खत ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकावर रस शोषण करणार्‍या किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायमिथोएट १५ मिली किंवा थायमेथॉक्झाम २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT