अवकाळी पाऊस 
ऍग्रो वन

अवकाळी पाऊस..द्राक्ष बागेचे लाखो रुपयांचे नुकसान

अवकाळी पाऊस..द्राक्ष बागेचे लाखो रुपयांचे नुकसान

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगली शहरासह परिसरामध्ये मंगळवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. सांगलीच्‍या मिरज पूर्व भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (sangli-news-Untimely-rains-locks-of-vineyards-worth-lakhs-of-rupees)

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे. आजही ढगाळ वातावरण जिल्ह्यात आहे. याचा फटका द्राक्ष बागेला बसला आहे. मिरज पूर्व भागात द्राक्ष बागांनी बहर धरला आहे. त्यात मंगळवारी झालेल्‍या अवकाळी पावसाने द्राक्ष घड कुजीची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

फुलोरा कुजण्याची भीती

एकीकडे कोरोना महामारीमध्ये फटका बसल्यानंतर द्राक्ष बागायतदार कसाबसा यंदा द्राक्ष बाग जोमात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधून मधून पावसाच्या सरीमुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यात काल पडलेल्या अवकाळी पावसाने फुलोरामध्ये आलेल्या बागा कुजण्याची भीती आहे. काहींची ७० टक्के तर काहींची शंभर टक्के बागा वाया जात आहेत. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT