farmer saam tv
ऍग्रो वन

Sangli: भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी विमा भरल्याची खात्री करावी : मनोज वेताळ

११ हजार १०४ शेतकऱ्यांची विमा भरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.

विजय पाटील

सांगली : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना (crop insurance ) खरीप हंगाम २०२१-२२ अंतर्गत सांगली (sangli) जिल्ह्यातील एकूण १२ हजार १९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील काही महसूल मंडळासाठी विमा नुकसान भरपाई लागू झालेली आहे. काही शेतकऱ्यांची (farmers) विमा नुकसान भरपाईची रक्कम कागदपत्रातील त्रुटीमुळे त्यांच्या बँक खात्यावर जमा होवू शकली नाही. यामध्ये बँक खाते नंबर किंवा अस्पष्ट कागदपत्रे इत्यादी बाबीमुळे खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकलेली नाही. संबंधित शेतकऱ्यांनी विमा नुकसान भरपाई जमा होण्यासाठी विमा भरल्याची खात्री करून एच.डी.एफ. सी. एर्गो विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून त्रुटींची पुर्तता करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोज वेताळ (District Superintendent of Agriculture Manoj Vetal) यांनी केले आहे. (sangli latest marathi news)

एच. डी. एफ. सी. एर्गो विमा कंपनीकडील अहवालानुसार ११ हजार २३० शेतकऱ्यांसाठी एकूण १८ कोटी ४५ लाख ६३ हजार ६७५ इतकी नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाली आहे. त्यापैकी ११ हजार १०४ शेतकऱ्यांची विमा भरपाई प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.

तथापि १२६ शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाईची रक्कम कागदपत्रातील त्रुटीमुळे त्यांच्या बँक खात्यावर जमा होवू शकली नाही. यामध्ये बँक खाते नंबर किंवा अपुर्ण कागदपत्रांमुळे खात्यामध्ये रक्कम जमा होऊ नाही असे कृषी खात्याने नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT