Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा कहर; फळ पिकांसह उन्हाळी पिकांचं मोठे नुकसान

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार तडाखा दिला. शिवाय उन्हाळी पिकांना देखील याचा मोठा फटाका बसला आहे. तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. 

राज्यात अवकाळी पावसाचे (Rain) थैमान सुरूच आहे. अनेक भागात अजून देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याचे सुद्धा पहायला मिळाले. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी अधिक होत असतानाच उकाडा मात्र कायम आहे. दरम्यान मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.

अवकाळी पावसामुळे शेतकरी (Farmer) आर्थिक संकटात सापडल्याने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पैठण तालुक्यातील खादगाव, कडेठान, बिडकिन, पाचोड आणि वडजी या शिवारात शेतकऱ्यांच्या पपई आणि फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

SCROLL FOR NEXT