Leopard Attack Saam tv
ऍग्रो वन

Leopard Attack : बिबट्याचा महिलेवर प्राणघातक हल्ला; मुलांसह शेतात कापूस वेचणी करतानाची घटना

Sambhajinagar News : अनेकांना शेतशिवारात बिबट्या निदर्शनास पडला होता. दरम्यान शेतामध्ये कापूस वेचणीचे काम सुरु असून रेणुका वीर ह्या आपल्या शेतामध्ये मुलांसह कापसाची वेचणी करण्याचे काम करत होत्या

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील एका ३१ वर्षीय महिलेवर बिबट्याने प्राण घातक हल्ला केला. शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून यात महिला जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

रेणुका विठ्ठल वीर (वय ३१) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. (sambhajinagar) अन्न पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावशिवाराकडे येत आहेत. यामुळे गावशिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेकांना शेतशिवारात बिबट्या निदर्शनास पडला होता. दरम्यान शेतामध्ये कापूस वेचणीचे काम सुरु असून रेणुका वीर ह्या आपल्या शेतामध्ये मुलांसह कापसाची वेचणी करण्याचे काम करत होत्या. 

कापूस वेचणीच्या कामात व्यस्त असताना पाठीमागून अचानक (Leopard Attack) बिबट्याने त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला चढवला. यामध्ये रेणुका यांच्या पायाला आणि हाताला जखम झाली आहे. आईवर बिबट्याने हल्ला केल्याचे पाहून मुलांनी आरडा ओरड केल्यानंतर बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. यानंतर रेणुका यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

SCROLL FOR NEXT