Sambhajinagar Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Sambhajinagar Heavy Rain : परतीच्या पावसाने हाहाकार; तोडलेला मका पाण्यात, शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान

Sambhajinagar News : राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस होत आहे.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून पार्टीच्या पावसाला सुरवात झाली आहे. दरम्यान या पावसाने हाहाकार माजविला आहे. जोरदार पाऊस होत असल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी  पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे नद्यांना पूर आला तर नदी नाले देखील खळखळून वाहू लागले. 

प्रामुख्याने या दिवसात पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस मानला जात असतो. त्यानुसार राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार (Sambhajinagar) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस होत आहे. मुसळधार पाऊस होत असल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. 

जिल्ह्यातील करमाड परिसरात असणाऱ्या लाडसावंगी शिवारात झालेल्या (Heavy Rain) जोरदार पावसामुळे अनेक पिकांचा मोठा नुकसान झाले आहे. कपाशी आणि तोडून ठेवलेला मक्का या पिकांचं मोठे नुकसान झालं असून शेतात पाणी साचल्याने हातातोंडाशी आलेली मक्का उध्वस्त झाला आहे. त्यामुळे मोठा फटका या पावसाचा शेतकऱ्यांना बसलाय. दरम्यान झालेल्या या नुकसानीचे पंचनामे करावी अशी मागणी आता शेतकरी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

SCROLL FOR NEXT