Garlic Price Saam tv
ऍग्रो वन

Garlic Price : लसणाच्या दरात दुपटीने वाढ; पालेभाज्यांचे दरही कडाडले

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी भाजी मार्केटमध्ये गावरान लसणाचा भाव ५०० रुपये किलोवर गेला आहे. तर साध्या लसणाचा भाव तीनशे रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे लसणाची झणझणीत फोडणी आता महागली आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : किरकोळ व होलसेल बाजारात लसणाच्या दरात वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दीडशे रुपये किलो दराने विकला जाणारा लसूणाचे दर आता तीनशे रुपयांच्या वर पोहचले आहेत. याशिवाय भाजीपाल्यांचे दर देखील भरमसाठ वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी भाजी मार्केटमध्ये गावरान लसणाचा भाव ५०० रुपये किलोवर गेला आहे. तर साध्या लसणाचा भाव तीनशे रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे लसणाची झणझणीत फोडणी आता महागली आहे. महिनाभरापूर्वी गावरान लसणाचा भाव एका किलोला अडीचशे रुपये होता. घाऊक बाजारात त्यापेक्षा चढ्या दराने भाजी विक्रेते विकत आहे. आवक घटल्याने दुपटीपेक्षा जास्त भाव वाढला आहे. 

शेतकऱ्यांकडील लसूण येणे अजून बाकी 

दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांकडून अद्याप लसूण बाजारात आला नाही. शिवाय बाहेरच्या राज्यातून येणारा लसूण देखील कमी प्रमाणात येत असल्यानं लसणाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. आणखी काही दिवस लसणाचे भाव चढेच राहतील असा अंदाज आहे. याशिवाय भाजीपाल्याच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे नजरेत कोलमडले आहे. 

तुरीच्या दरात घसरण

वाशीम : नवीन तूर बाजारात येण्यासाठी अवघा एक महिन्याचा कालावधी बाकी आहे. असे असताना तुरीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याच पाहायला मिळत आहे. वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला काल ८ हजार ६०० रुपये दर मिळाला. तर वाशिम बाजार समितीतही ९ हजारपर्यंत तुरीचे दर होते. गेल्या काही दिवसात तुरीच्या दरात एक ते दीड हजार रुपयाची घसरण झाली आहे. मागील हंगामात तुरीला १२ हजार पर्यंतचे उच्चांकी दर मिळाल्यानं यावर्षी तुरीच्या पेऱ्यात वाढ झाली होती. आता दरात घसरण होत असल्यानं शेतकरी चिंतेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

NCMC Card : आजपासून नियम बदलला! 'या' महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद; घ्यावे लागणार पूर्ण तिकीट, वाचा सविस्तर

Chutney For Cholesterol: नसांमध्ये घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचा थर साचतोय? रोजच्या आहारात फक्त 'ही' एक चटणी खा

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT