Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil saam tv
ऍग्रो वन

Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांच्या दाै-यानंतर पंचनाम्यासाठी शेतक-यांना मागितले एकरी चारशे रुपये

साम न्यूज नेटवर्क

- सचिन बनसाेडे

Radhakrishna Vikhe Patil : एकीकडे शेतात नुकसान झालं आहे तर त्याचा पंचनामा करण्यासाठी आता पैसे मागितले जात आहेत असा आराेप शेतक-यांकडून हाेऊ लागला आहे. केवळ आराेपच नव्हे तर पैसे मागतानाचा प्रकार काही शेतक-यांनी माेबाईलमध्ये कैद केला आणि ताे व्हायरल केला. यामुळे आता प्रशासन नेमकी काेणती कारवाई करणार याकडे शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे. हा प्रकार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नगर जिल्ह्यात घडल्याची चर्चा आहे. (Radhakrishna Vikhe Patil Latest Marathi News)

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नगर (nagar) जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकरी चारशे रुपये घेतले जात असल्याने या प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री विखे यांनी काही दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यात दौरा केल्यानंतर अशा प्रकारची पैशाची मागणी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Maharashtra News)

राज्यभरामध्ये सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा विषय सर्वत्र गाजत चाललेला आहे, जास्तीचा पाऊस (rain) झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये सुद्धा जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यातच शेतामध्ये असलेली उभी पिके ही भुईसपाट झालेली आहे सोयाबीन, कापूस, गहू यासारखे अनेक पिके ही वायाला गेलेले आहेत तर भाजीपाल्यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे.

शेतकऱ्यांनी नुकसानीचा पंचनामे करून आम्हाला तत्काळ मदत द्या अशी मागणी सुद्धा या अगोदर सरकारकडे केलेली आहे तर तसेच विविध राजकीय पक्षांनी सुद्धा या विषयाकडे लक्ष वेधून सरकारकडे अशा प्रकारची मागणी केलेली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे नगर जिल्ह्यातील आहे त्यांनी गेल्या चार दिवसांमध्ये नगर जिल्ह्याचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये दौरा करत वेळप्रसंगी त्यांनी हेलिकॉप्टरची मदत घेत त्यांनी बांधावर जाण्याचा प्रयत्न केला व शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती.

तातडीने पंचनामे करून ते सादर करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी येथील जिल्हा प्रशासन दिले होते. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये सध्या तहसील कार्यालयामार्फत तसेच कृषी विभागामार्फत गावोगावी पथक नेऊन हे पंचनामे केले जात आहे. अद्यापपर्यंत पंचनामे पूर्णत्वाला गेलेले नाही त्यामुळे अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला नाही.

गेल्या तीन दिवसांपासून नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार सध्या अनेकांच्या माेबाईलमधून व्हायरल हाेत आहे. एक पथक नेवासा तालुक्यामध्ये पंचनामा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांनी संबंधित शेतकऱ्याला एकरी चारशे रुपये प्रमाणे पैसे द्या म्हणून सांगितले. त्याने त्याचा विरोध केला. या सर्व बाबींचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालेला आहे.

या प्रकारामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतक-यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आधीच पंचनामे झाले नसल्याने शेतकरी मदतीपासुन वंचित आहेत. दरम्यान पैसे मागण्याच्या प्रवृत्तींवर आता महसूलमंत्री विखे पाटील आणि प्रशासन काेणती कारवाई करणार याकडे शेतक-यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Radhakrishna Vikhe Patil Latest Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor: जान्हवीच्या फोटोशूटची चर्चा; गळ्यात कोणाच्या नावाचं नेकलेस?

Today's Marathi News Live : राहुल गांधी एक प्रवासी, देवेंद्र फडणवीस यांंचा खोटक टोला

Relationship Tips: 'या' मुलांच्या प्रेमात चुकूनही पडू नका; आयुष्य होईल उद्धस्त

MI vs KKR, IPL 2024: मुंबई की कोलकाता? कोण मारणार बाजी? पाहा दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

Health Tips: एक महिना साखर खाणं करा बंद; शरीराला होतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT