Onion  Saam tv
ऍग्रो वन

Onion Price : कांद्याचे दर तेजीत..साठवणूक केलेल्या कांद्याची बाजारात आवक

Pune News : कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर कांद्याची कवडीमोल किंमत होत असताना शेतकऱ्यांनी कांद्याची काही प्रमाणात साठवणुक केली होती

रोहिदास गाडगे

मंचर (पुणे) : कांद्याला आतापर्यंत अपेक्षित दर मिळत नव्हते. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती. मात्र प्रदिर्घ काळानंतर कांद्याला चांगला बाजारभाव मिळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे उत्तर पुणे जिल्ह्यात साठवणुक केलेला कांदा आता बाजारात दाखल करण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. 

कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर कांद्याची (Onion) कवडीमोल किंमत होत असताना शेतकऱ्यांनी कांद्याची काही प्रमाणात साठवणुक केली होती. सध्या कांद्याचे बाजारभाव तेजीत असुन आता साठवणुकीतला कांदा बाजारात दाखल होऊ लागला आहे. दरम्यान बाजारभाव चांगला मिळत असताना मंचर, चाकण, आळेफाटा (Bajar samiti) बाजार समितीत कांद्याला प्रतिकिलो २५ ते ३५ रुपयांचा बाजारभाव मिळु लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत आहे.  

कांद्याच्या वजनात घट 

कांद्याला चांगला दर मिळत असला तरी उत्पादनाच्या तुलनेत साठवणुकीतील कांद्याच्या वजनात २५ टक्क्यांनी घट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे आवकही कमी होत असल्याने कांद्याचे बाजारभाव पुढील काही दिवस तेजीतच रहाणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

Tilache Ladoo : हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा रेसिपी

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

SCROLL FOR NEXT