Vegetables Price Hike Saam Tv
ऍग्रो वन

Pitru Paksha 2023 : पितृपक्षाचा परिणाम, भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले

Vegetables Price Hike : गणेशोत्सवाच्या पूर्वी भाजीपाल्याचे दर कमालीने पडले होते.

रोहिदास गाडगे

Pune News : पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट होऊन आवक घटली आहे. परिणामी आठवडेबाजारात तरकारी मालासह भाजीपाला महागल्याचे चित्र आहे. (Maharashtra News)

गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला (pitru paksha 2023) सुरुवात झाली आहे. पितृपक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा आहे. यासाठी आख्यिकेनुसार विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते.

त्यात एक मिश्र भाजी ही अगत्याने असतेच परंतु, यंदा परतीचा पाऊस आणि त्यात अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून विविध भाज्यांची बाजारात आवक घटली आहे.

दरम्यान मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर दुपट्टी, तिप्पटीने वाढून गगनालाच भिडले आहेत. यात भाज्यांची चव वाढविणारी कोथींबीरही महागली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वी भाजीपाल्याचे दर कमालीने पडले होते.

वांगे, टोमॅटो, भेंडी आदींना १० ते २० रुपये प्रति किलोचा दर मिळत होता, परंतु, गणेशोत्सव सुरू होताच भाजीपाला कडाडला. भाजीपाल्याच्या दरात दुपट्टीने वाढ झाली आहे. आता पितृपक्षात तर भाववाढीचा आलेख चढतच आहे. नागरिकांना चढ्या दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर (सर्व कमाल दर)

वाटाणा - 1000 रुपये (प्रति 10 किलो)

दुधी भाेपळा - 300 रुपये

डाेंगर भापेळा - 150

भेंडी - 432

कारले - 300

गवार - 1001

आले - 1100

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT