गाळप केलेल्‍या ऊसाला FRP प्रमाणे भाव द्या - रमेशअप्पा कराड दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

गाळप केलेल्‍या ऊसाला FRP प्रमाणे भाव द्या - रमेशअप्पा कराड

शासनाच्‍या नियमानुसार गाळप केलेल्‍या ऊसाला FRP प्रमाणे भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी क्रांतीदिनी मांजरा कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आले आहे.

दीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर : शासनाच्‍या नियमानुसार गाळप केलेल्‍या ऊसाला FRP प्रमाणे भाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी क्रांतीदिनी मांजरा कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील भाजपाचे BJP लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मांजरा परिवारातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात हजारोंच्या संख्‍येनी सहभागी झाले होते सदरचे आंदोलन भाजपचे अमादार रमेश कराड Ramesh Karad यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.

हे देखील पहा-

गाळप केलेल्‍या ऊसाला एफआरपी प्रमाणे भाव देण्‍याचे शासनाचे बंधन असून मांजरा परिवारातील मांजरा, विलास, विलास -२ आणि रेणा साखर कारखान्‍यांनी आतापर्यंत केवळ प्रतिटन २२००/- रूपये याप्रमाणे शेतकऱ्यांना भाव दिला आहे. सध्या शेतकरी अडचणीत आहे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे होणारी रक्‍कम आणि प्रत्‍यक्ष दिलेली रक्‍कम यातील फरकाची रककम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी अशी मागणी आ. रमेशअप्पा कराड यांनी केली आहे

मांजरा परिवारातील साखर कारखान्यांना हजारो शेतकऱ्यांनी लाखो टन ऊस गाळपासाठी दिलेला आहे. मात्र या शेतकऱ्यांना अद्याप एफआरपी प्रमाणात ऊसाचा भाव मिळाला नाही असे सागून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, गाळपासाठी ऊस दिलेले सर्वजण कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आहेत. FRP प्रमाणे त्यांना भाव मिळाला पाहिजे हा त्यांचा हक्क आहे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा आणि घामाचा मोबदला मिळालाच पाहिजे ही त्यांची आग्रही भुमिका आहे.

मांजरा परिवारातील साखर कारखान्याकडे गाळपास ऊस दिलेल्या शेतकऱ्यांची प्रतिटन रक्‍कम मांजरा कारखाना ५७५/- रूपये, विलास कारखाना ४९९/- रूपये आणि रेणा साखर कारखाना ६५६/- रूपये याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर तात्काळ मिळाली पाहिजे. या मागणीसाठी क्रांतीदिनी मांजरा कारखान्यासमोर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात आले आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉम्ब से उडा दूंगा... संजय राऊत यांच्या घरी मुंबई पोलिसांसह बॉम्बशोधक पथक, बंदोबस्त वाढवला VIDEO

New Year Resolution 2026: नवीन वर्षात, नवीन सुरूवात; स्वत:साठी करा हे संकल्प

New Zealand New Year Celebration Video: जगात सर्वात आधी न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं सेलिब्रेशन का होतं? बघा VIDEO

Bunty Jahagirdar firing Case: श्रीरामपूर हादरलं! जर्मन बेकरी बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारवर गोळीबार

Maharashtra Politics: चंद्रपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड, भाजपने बड्या नेत्याला पदावरून तडकाफडकी हटवलं

SCROLL FOR NEXT