Crime News saam tv
ऍग्रो वन

Crime News : सातारा, बुलडाणा, गंगाखेड, परभणीतील भामट्यांवर गुन्हा दाखल; साडेबारा लाखांचा घातला गंडा

परळी शहर पोलिसांनी घेतली तक्रारीची दखल.

विनोद जिरे

Beed Crime News : शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचा करार करून पाच जणांकडून प्रत्येकी अडीच लाख रुपये उकळून साडेबारा लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ही घटना बीडच्या परळीत घडली आहे. परळी शहर पोलिस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या ॲग्रो कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नप्रभा प्रमोद परळीकर (रा. शंकर पार्वती नगर, परळी ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोका अॅग्रो फूडस इंडिया प्रा.लि. कंपनीचे परळी शहरात कार्यालय आहे. शेतकऱ्यांकडून अडीच लाख रुपये घेऊन त्याबदल्यात शेळीपालन व्यवसायासाठी शंभर करडू, एक पत्र्याचे शेड, दोन कामगार व महिना २५ हजार रुपये देण्याचा करार काही लाेकांनी केला.

कंपनीच्या या योजनेला भुलून पाच जणांनी गुंतवणूक केली. मात्र नंतर कंपनीने ना शेळ्यांचे (sheep) करडू दिले ना महिना २५ हजार रुपये. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर रत्नप्रभा परळीकर यांनी परळी शहर पोलिसांकडे (police) धाव घेतली.

दरम्यान त्यांच्या फिर्यादीवरून कंपनीचा कार्यकारी संचालक अजितकुमार हिरवे (रा. कोडोली, जि.सातारा), भागवत तांदळे (रा. चोरपांगरा, ता. लोणार, जि. बुलडाणा), सुधाकर मुंडे, सूर्यकांत गुट्टे (दोघे रा. गंगाखेड, जि. परभणी) व बापूराव मुळे (रा. महातपुरी, ता. गंगाखेड) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT