Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : बँकेकडून कर्ज भरण्याबाबत नोटीस; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

Parbhani News : पावसाच्या लहरीपणामुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. शिवाय जे उत्पन्न मिळाले याला चांगला दर न मिळाल्याने कर्जाची रक्कम फेडू शकत नाही

राजेश काटकर

परभणी : शेतीसाठी काढलेले कर्ज चांगले उत्पन्न न आल्याने फेडू शकत नाही. यात बँकेकडून कर्ज भरण्याबाबत आलेल्या नोटिसीमुळे तणावात असलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. (Parbhani) परभणी जिल्ह्यात हि घडली असून शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी मारून जीवन यात्रा संपविली. (Breaking Marathi News)

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील कानेगाव येथील शेतकरी (Farmer) अमोल निळकंठ बोकारे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्याचे नाव आहे. अमोल बोकारे यांनी (Bank) बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्ज घेतले होते. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. शिवाय जे उत्पन्न मिळाले याला चांगला दर न मिळाल्याने कर्जाची रक्कम फेडू शकत नाही. यात बँकेला दिलेली मुदत संपल्याने बँकेकडून देखील कर्ज भरण्यासाठी तगादा लावला जात होता.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बँकेने सतत कर्ज भरण्याचा तगादा लावत अमोल बोकारे या शेतकऱ्यास नोटीस दिली होती; असे नातेवाईकाचे म्हणणे असून यामुळे तणावात आलेल्या अमोल बोकारे यांनी १८ एप्रिलला रात्री दहाच्या सुमारास धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेकडून वसुलीचा तगादा व कर्जाला कंटाळून शेतकरी अमोल बोकारे यांनी आत्महत्या केल्याची नातेवाईकाकडून बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माऊलीच्या पालखीचं पुण्याहून सासवडकडे प्रस्थान

Saturday Horoscope: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला; वाचा शनिवारचे राशीभविष्य

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT