Parbhani Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Parbhani Heavy Rain : ५० महसूल मंडळात अतिवृष्टी; परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; ठाकरे गटाची मागणी

Parbhani News : परभणी जिल्हात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे खरीपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले

राजेश काटकर

परभणी : राज्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. परभणी जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला असून परभणी जिल्ह्यातील एकूण ५२ मंडळापैकी ५० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. 

परभणी (Parbhani) जिल्हात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे खरीपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच मोठ्या प्रमाणात घराची पडझड झाली. तर अनेक शेतकऱ्यांच्या गाई, म्हशी, शेळ्या व कोंबड्या वाहून गेल्या आहेत. ह्या पावसाने जिल्ह्यातील छोटे मोठे तलाव देखील भरले असून जिल्ह्यातील एकूण ५२ मंडळापैकी ५० महसूल मंडळात (Heavy Rain) अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूससह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती चांगले उत्पन्न होणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

खासदार संजय जाधव यांची राज्यपालांकडे मागणी 

अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस यासह जवळपास सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील हि सर्व परिस्थिती पाहता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी; अशी मागणी ठाकरे गटाची उपनेते तथा खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती- मुंबई विमान सेवा बंद, प्रवाशांचे नियोजन कोलमडले

India National Food: भारताचे राष्ट्रीय अन्न कोणते आहे? ९९% लोकांना माहित नसेल

Ukdiche Modak : नैवेद्य बनवताना उकडीचे मोदक फुटतायत? 'ही' एक सोपी ट्रिक वापरून तर बघा

Manoj Jarange Patil Protest Live Updates : बीडच्या 2 आमदारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Today Gold Rate: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव वाढले; वाचा १ तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT