Tragedy News : शेतकरी कुटुंबावर शोककळा; घरातील कर्ता मुलगा नदीवर बैल धुवायला गेला अन् विपरीत घडलं!

Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या बोदवड तालुक्यातील हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर (वय २७) या तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

बोदवड (जळगाव) : वर्षभर कष्ट करणाऱ्या सर्जाराजा प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. शेतकरी पोळ्याच्या दिवशीआनंदी वातावरण असते. मात्र पोळ्याच्याच दिवशी शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.   

Jalgaon News
Nanded Flood : नांदेडमध्ये पुरस्थिती कायम; गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, आतापर्यंत २०० कुटुंबांचे स्थलांतर

जळगाव (Jalgaon News) जिल्ह्याच्या बोदवड तालुक्यातील हरणखेड येथील गोपाल प्रभाकर वांगेकर (वय २७) या तरुणाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पोळा असल्याने तयारी सुरु होती. बैलांना साज चढविण्यापूर्वी गोपाळ सकाळी हा बैल धुण्यासाठी व्याघ्रा नदीवर गेला होता. बैल धूत असताना अचानक पुराच्या पाण्याचा लोंढा आल्याने यात तो वाहून गेला आणि गाळात फसून त्याचा मृत्यू झाला. यावेळी गावातील अनेक शेतकरी बैल धुण्यासाठी आले असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. 

Jalgaon News
Nandurbar News : पुराच्या पाण्यातून जाण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर; नदीवर पूल नसल्याचे नागरिकांची कसरत 

ग्रामस्थांनी लागलीच बैल नदीतून बाहेर काढला व गोपाळ वांगेकर याचा शोध घेतला, पण यश आले नाही. शेवटी बुलडाणा जिल्हा जलसंपदा आपत्तीग्रस्त विभागाची टीम बोलवून नावेच्या सहाय्याने शोध घेतला. दुपारी तीनच्या सुमारास वांगेकर याचा मृतदेह सापडला. मलकापूर (Malkapur) ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला. गोपाल वांगेकर याचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या मागे मुलगी, आई व वडील असा परिवार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com