Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : भाव नसल्याने शेतकऱ्यांनी साठवून ठेवला कापूस

राजेश काटकर

परभणी : मागील वर्षी भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला होता. यानंतर यंदा देखील (Farmer) शेतकऱ्यांवर तीच वेळ आली असून कापसाला यंदा अपेक्षेपेक्षा कमी भाव असल्याने (Parbhani) जिल्ह्यातील ६० टक्के शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला आहे. (Latest Marathi News)

परभणी जिल्ह्यात या खरीप हंगामात पावणे तीन लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. परंतु पावसाने मोठा खंड दिल्याने कापसाचे नुकसान झाले. तर कापूस फुटताना पुन्हा अवकाळी पावसाने नुकसान झाले. शेतकऱ्यांचे वर्षभराचे अर्थकारण कापसावर असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. गेल्या वर्षी कापसाला ९५०० ते ९८०० रुपये क्विंटल भाव मिळाला होता. परंतु या वर्षी पावसाने भिजलेल्या (Cotton Price) कापसाला व्यापाऱ्यांकडून ७ हजार ते ७ हजार २०० रुपये इतका भाव मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदाही भाववाढीची अपेक्षा 

गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी कापसाच्या भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरात ठेवला होता. त्यानुसार यंदा देखील शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर कापूस घरात साठवून ठेवला आहे. जिल्ह्यात जवळपास ६० टक्के कापूस शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर घरात साठवून ठेवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

SCROLL FOR NEXT