Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News: अल्पभूधारक शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; कर्ज फेडीची होती चिंता

अल्पभूधारक शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; कर्ज फेडीची होती चिंता

राजेश काटकर

परभणी : पाण्याअभावी शेतात ऊसाचे पीक वाळत आहे. शिवाय डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने सतत विवंचनेत असलेल्या एका अल्पभूधारक (Farmer) शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार (Parbhani) रोजी पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे घडली. (Latest Marathi News)

वाघाळा (ता. पाथरी) येथील बाबुराव योगाजी भंडारे (वय ५५) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बाबुराव भंडारे यांच्या नावे वाघाळा शिवारामध्ये गट क्रमांक २६३ मध्ये १ हेक्टर ५५ गुंठे शेती आहे. त्यांना तीन मुली, एक मुलगा, पत्नी, सुन असा परिवार आहे. तिन्ही मुलींचे लग्न झाले आहे. शेतकऱ्याने स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज होते. परंतु शेतातून उत्पन्न न आल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत भंडारे होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केली आहे. 

पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मयत शेतकऱ्याचे जावई परमेश्वर नवघरे यांच्या खबरीवरुन पाथरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : विदर्भाच्या मातीतला ऐतिहासिक ठेवा! 'हा' किल्ला इतिहासप्रेमींनी आवर्जून पाहावा

Name Plate Vastu Tips: घराच्या मुख्य दरवाजावर नेम प्लेट लावताना ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Maintenance Rules : सोसायटीचा मेंटेनन्स बुडवताय? मग थेट तुमचा फ्लॅट, गाडी आणि टीव्ही जप्त होणार, पाहा नियम

FASTag चा आला नवीन नियम; वाहनधारकांना होणार 'हा' मोठा फायदा, पाहा तुमच्या कामाची बातमी

SCROLL FOR NEXT