Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News: पावसाच्या हुलकावणीने पिक करपले; बँकेचे कर्ज फेडीच्या विवंचनेत शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल

राजेश काटकर

परभणी : जिंतूर तालुक्यातील गणपुर येथे गळफास घेऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे पुन्हा एकदा (Farmer) शेतकरी संकटात सापडला (Parbhani) असल्याचे समोर आले आहे. जगन शेवाळे (वय ४०) असं या मयत शेतकऱ्याचे नाव आहे. (Live Marathi News)

परभणी जिल्ह्यात या वर्षी मान्सून लहरीपणे बरसला आहे. काही ठिकाणी पेरण्या उरकल्या तर काही ठिकाणी दुबार/तिबार पेरण्या कराव्या लागल्या. जिल्ह्यात कुठेच पावसाचा शिडकाव झाला नाही. तर दररोज उन्हाळ्या सारखं कडक ऊन पडत असल्याने शेतातील सोयाबीन आणि कापसाचे पिक माना टाकून करपत आहे. तर ऊसही पाण्याअभावी वाळून जात आहे. शेतकऱ्यांनी उधार पाधार घेत कर्ज घेत पेरण्या केल्या. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांनी घरातील दागदागिने, बँकेचे कर्ज, हात उसने पैसे घेत खरीपाच्या (Rain) पेरण्या केल्या असून आता पाऊस पडत नसल्याने घेतलेले पैसे कसे परत करायचे या विवंचनेत शेतकरी असल्याने आत्महत्या सारखे पाऊल उचलत आहे.

साडेतीन लाखाचे कर्ज 

जगन शेवाळे यांच्याकडे साडेतीन एक्कर जमीन असून  त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचे (Bank) दीड लाख रुपयांचा कर्ज होते. तर जगनच्या वडिलांकडे इंडिया बँकेचे दोन लाख रुपयांचा कर्ज असल्याचं नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे. या कर्ज वसुलीसाठी वारंवार बँकेकडून फोन येत होते. त्या तणावांमधून त्यांनी हा प्रकार केल्याचं समोर आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT