Crop Loan Saam tv
ऍग्रो वन

Crop Loan : खरीप संपला तरीही कर्ज वाटप होईना; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Parbhani News : परभणी जिल्ह्यात गतवर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर केलेल्या खर्च वाया गेला

राजेश काटकर

परभणी : खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकेमार्फत पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात असते. मात्र यंदाचा खरीप हंगाम संपण्यावर आला असताना शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कर्ज वाटप होत नसल्याचे चित्र परभणी जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरु आहे.  

परभणी (Parbhani) जिल्ह्यात गतवर्षी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर केलेल्या खर्च वाया गेला. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी पीक कर्ज (Crop Loan) उपलब्ध व्हावे, यासाठी जवळपास १५०० कोटी रुपयांचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. त्यानुसार प्रत्येक बँकेला उद्दिष्ट आखून दिले आहे. मात्र या नियोजनावर बँका काम करत नसल्याचे दिसून येत आहे. 

अर्ज देऊनही कर्ज मिळेना 

जिल्ह्यातील काही बँकांनी केवळ १० ते १५ शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप केल्याची माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीआधी बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला. सोयाबीन महिनाभरात कापणीला येणार आहे. मात्र अद्यापपर्यंत बँकेने त्या अर्जावर कोणतेही कार्यवाही केलेली नाही. खरीप हंगाम संपला तरीही यांचे काही पीक कर्ज वाटप होत नसल्याचे शेतकऱ्यामध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माजी आमदाराच्या भाजप प्रवेशावरून जिल्ह्यात राजकीय वादंग

Ration Shop : दिवाळी सणात निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य वाटप; आळ्या, किडे असलेले धान्य मिळाल्याने नागरिकांचा संताप

Spruha Joshi In Saree: खूपच सुंदर दिसतेस स्पृहा जोशी, सौंदर्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या

India vs South africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; ऋषभ पंतकडे कर्णधारपदाची जबाबदारी

Vashi Fire: नवी मुंबईत मोठ्या इमारतीत भीषण आग; चिमुकलीसह चौघांचा मृत्यू, घटनेमागे वेगळंच कारण समोर

SCROLL FOR NEXT