परभणी : खरीप हंगाम तोंडावर आला असतांना बनावट बियाणे बाजारपेठेत (Bogus Seeds) दाखल झाले आहेत. यात तुलसी सिड्सच्या बनावट कपासी बियाणाची तब्बल ९५३ पाकीटे कृषी विभागाने पाठलाग (Parbhani) करीत मानवत रोड येथे पकडले आहे. (Mahrarshtra News)
खरीप हंगामाच्या तोंडावर कापसाचे बोगस बियाणे बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे. परभणी जिल्ह्यातील ७०६७ कापुस वाणाच्या बॅगला काही कृषी केंद्र चालकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यात कापसाच्या कबड्डी, यु.एस. हे वाण आहे. परभणी शहरासह ७०६७ या वाणाच्या बॅगची विक्री बाजार भावापेक्षा अधिक किंमतीने करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. तसेच नावा सामान बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असून शेतकऱ्यांची (farmer) आर्थिक लूट करून फसवणूक होत आहे. परंतु कृषी विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
चौघांवर गुन्हा दाखल
यातच जिल्ह्यात बोगस कापूस बियाणे विक्रीसाठी दाखल झाले होते. गाडीतून वाहतूक केली जात असताना कृषी विभागाच्या (Agriculture Department) पथकाने पकडून बियाणे ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यामध्ये चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरोज तिवारी, लामेश भगवान पाटील, तुषार रवींद्र पाटील, मोहित चंद्रकांत इंगळे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.