Farmer Success Story Saam tv
ऍग्रो वन

Farmer Success Story : ऊसतोड मजुराने माळरानावर फुलवली डाळिंबाची बाग; युरोपात होतेय निर्यात

Pandharpur News : सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर गौडवाडी गाव‌ आहे. या भागात कायमस्वरूपी दुष्काळ जाणवत असतो. यामुळे येथील लोक रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी स्थलांतरीत झाले आहेत

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील गौडवाडी येथील सोपान शिंगाडे या शेतकऱ्यांने खडकाळ माळरानावर (Pandharpur) डाळिंबाची बाग फुलवली आहे. त्यांचे हे डाळींब युरोपात निर्यात होत आहे. लाल भडक अशा डाळिंबाला प्रति किलो १२५ रूपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. (Maharashtra News)

सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर गौडवाडी गाव‌ आहे. या भागात कायमस्वरूपी दुष्काळ जाणवत असतो. यामुळे येथील लोक रोजगाराच्या निमित्ताने बाहेरगावी स्थलांतरीत झाले आहेत. दरम्यान मागील तीन वर्षांपासून टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आल्याने या भागात डाळिंब लागवड वाढली आहे. दरम्यान सोपान शिंगाडे (Farmer) यांनी ऊस तोड मजुरी करून खडकाळ माळरानवर डाळिंब शेती फुलवली आहे. शिंगाडे यांच्याकडे आजपर्यंत २० एकर क्षेत्रावर भगवा डाळिंब बाग आहे. सध्या आठ एकरावरील डाळिंबाची काढणी सुरू आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

युरोपात निर्यात 

वजन, आकार, रंग आणि चव अशी विविध गुणवैशिष्ट्ये असलेले त्यांचे डाळिंब युरोपात निर्यात झाले आहे. एकाच वेळी ४० टन डाळिंब युरोपात निर्यात झाले आहे. यातून शिंगाडे यांना सुमारे ५० लाख रूपयांचे उत्पन्न हाती आले आहे. लागवडीपासून ते फळ धारणेपर्यंत शिंगाडे यांनी बागेचे योग्य व्यवस्थापन केल्याने त्यांना निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणे शक्य झाले आहे. त्यांची ही डाळिंब बाग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamin B12 च्या कमतरतेमुळे काय त्रास होतो? अमेरिकेतल्या डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

Maharashtra Nagar Parishad Live : आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Local Body Election : पोलिसांच्या तावडीतील बोगस मतदार आमदाराच्या मुलानं पळवला; बुलढाण्यातील प्रकार|VIDEO

Maharashtra Live News Update: राजभवनाचं नाव आता ‘लोकभवन’

Chole Bhaji Recipe: ढाबा स्टाईल चमचमीत छोले भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT