Bedana Market Saam tv
ऍग्रो वन

Bedana Market : एकाच महिन्यात १३१ कोटी रुपयांच्या बेदाण्याची विक्री; पंढरपूरच्या‌ बाजार समितीमध्ये मोठी उलाढाल

Pandharpur News : रमजान ईद, गुढीपाडवा सण तोंडावर आले आहेत. त्यामुळे बेदाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. पंढरपूरच्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला बेदाणा विक्रीसाठी आणला जात आहे

भारत नागणे

पंढरपूर : पश्चिम महाराष्ट्रात बेदाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पंढरपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे मागील महिन्याभरात बाजार समितीमध्ये जवळपास १३१ कोटी रुपयांच्या बेदाण्याची खरेदी विक्री झाली आहे. हि विक्री अजून देखील सुरूच असून 

सध्या रमजान ईद, गुढीपाडवा सण तोंडावर आले आहेत. त्यामुळे बेदाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. दरम्यान पंढरपूरच्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला बेदाणा विक्रीसाठी आणला जात आहे. गेल्या एक महिन्यांमध्ये जवळपास ४ हजार ७०० टन बेदाण्याची विक्री करण्यात आली आहे. या विक्री मधून जवळपास १३१ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. 

उच्च प्रतीच्या बेदाण्याला ६०० रुपये दर 

काल झालेल्या बेदाणा सौदे बाजारात अडीच हजार टन बेदाण्याची आवक झाली होती. पंढरपूर बाजार समितीमध्ये उच्च प्रतिच्या बेदाण्याला सर्वाधिक प्रति किलो सहाशे रुपयांचा दर मिळाला. तर सरासरी तीनशे रुपयांचा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड यांनी दिली.‌ 

काकडी लागवडीतून शेतकऱ्यांना लाखोचा फायदा
नाशिकच्या मालेगाव तालूक्यात अनेक शेतकरी डाळींब शेती बरोबरच अन्य प्रयोग करीत असतात. दरम्यान दुंधे येथील तरूण शेतकरी अमोल रौंदळ याने एक एकरात पहिल्यांदाच नाझिया वाणाच्या काकडीची लागवड केली. लागवडीसाठी ४० हजाराचा खर्च झाला. ५० दिवसानंतर आता काकडीची तोडणी सुरु झाली असून एक एकरातून १० टनाचे उत्पन्न निघणार आहे. आतापर्यंत खर्च वजा जाता लाखोंचा फायदा काकडी पिकातून झाला. पहिल्याच प्रयोगातून चांगले उत्पादन निघाल्याने शेतकऱ्याने समाधान व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

Parbhani Accident: कीर्तनाहून येताना भयंकर अपघात, ३ वारकर्‍यांचा जागीच मृत्यू, दत्ता महाराज मुडेकरांचं निधन

Beetroot Face Cream: घरच्या घरी बनवा बीटरूट फेस क्रिम, आठवडाभरात चेहऱ्यावर दिसेल गुलाबी चमक

SCROLL FOR NEXT