Mango Solapur news Saam tv
ऍग्रो वन

Pandharpur News: खडकाळ माळरानावर पिकविले आंबे; सहा एकरातून १ कोटीचे उत्पन्न

खडाकाळ माळरानावर पिकविले आंबे; सहा एकरातून १ कोटीचे उत्पन्न

भारत नागणे

पंढरपूर : माळशिरस तालुक्यातील खुडूस येथील केशव सलगर यांनी आपल्या खडकाळ माळरानावर केशर आंब्याची बाग फुलवली आहे. त्यांच्या (Mango) आंब्याची यंदा प्रथमच विविध देशात (Farmer) निर्यात झाली आहे. रसळा आणि स्वादिष्ट केशर आंब्याला स्थानिक बाजारात मोठी मागणी असतानाही आता याच आंब्यांनी‌ परदेशातील खवय्यांना ही चांगलीच भूरळ घातली आहे. (Tajya Batmya)

यंदाचा हापूस आंब्याचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. त्यातच तो बाजारात उशिरा येत असल्याने हापूसची जागा आता केशरने घेतली आहे. दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी केशर आंब्याची लागवड केली आहे. खुडूस येथील शेतकरी केशव सलगर यांच्याकडे सहा एकर केशर आंब्याची बाग आहे. बागेचे योग्य व्यवस्थापन आणि खत आणि पाण्याचे चांगले नियोजन केल्याने आंब्याची झाडे फळांनी लगडली आहेत.

सव्‍वा कोटीपर्यंत उत्‍पन्‍न अपेक्षित

सरासरी प्रति झाड ७० ते ८० किलो इतके उत्पादन मिळण्याची त्यांना‌ आशा आहे. त्यांच्या आंब्याची जागेवर प्रती किलो १२० रूपये दराने विक्री सुरू आहे. त्यांना किमान यंदा १०० टनापेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित आहे. त्यातून त्यांना अंदाजे १ कोटी २० लाख रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ऊस, केळी या पिकांपेक्षा कमी पाण्यात आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न आंबा बागेतून मिळू लागल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी आंब्याच्या शेतीकडे वळू लागले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jalgaon Crime News : जळगाव पुन्हा हादरले; भररस्त्यात गाठून तरुणाची हत्या

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT