Palghar news Saam tv
ऍग्रो वन

Palghar news : चिकू लिलाव केंद्र तीन दिवस राहणार बंद; मुसळधार पावसामुळे दरात घसरण

Palghar news : गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु होता. पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर पाच हजार हेक्टर क्षेत्रावर चिक्कू लागवड करण्यात आलेली आहे

रुपेश पाटील

पालघर : मागील काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघरमध्ये उत्पादित होणाऱ्या चिकूचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे चिकू खरेदी करणारी लिलाव केंद्र कालपासून सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे डहाणूच्या चिकू उत्पादक शेतकऱ्यांचे दररोज किमान दहा लाख रुपयांचे नुकसान होत आहे. 

पालघरच्या (Palghar) पश्चिम किनारपट्टीवर पाच हजार हेक्टर क्षेत्रावर चिक्कू लागवड करण्यात आलेली आहे. या बागांमधून मोठ्या प्रमाणात चिकू काढणी केली जाते. सद्यस्थितीत दररोज ५० ते ६० टन चिकू तयार होतात. गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु होता.मात्र पावसामुळे चिकू या फळावर परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत असून या चिकूचे दर सध्या कमालीने घटल्याने चिकू उत्पादक शेतकरी सध्या संकटात सापडलेला पाहायला मिळत आहे. 

दर दहा रुपयांनी घसरले 

दरम्यान डहाणू (Dahanu) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडावरील तसेच वाहतुकी दरम्यान बॉक्समधील बंदिस्त उदार वातावरणामुळे चिकू सडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे चिकूचे दर दहा ते बारा रुपये किलोवरून थेट दोन ते तीन रुपये प्रति किलो इतके घसरले आहेत. परिणामी डहाणू तालुक्यातील चिकू उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT