पाचोरा (जळगाव) : जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून परतीचा पाऊस होत असून विजांचा कडकडाटासह पाऊस होत असून वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याच दरम्यान पाचोऱ्यापासून जवळ असलेल्या सोयगाव तालुक्यातील बोरमाळतांडा शिवारात वीज पडून शेतात काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला.
सदरची घटना २१ ऑक्टोम्बरला दुपारी चारच्या सुमारास घडली. यात अजय नथ्थू राठोड (वय २०, रा. बोरमाळतांडा) व अश्विनी मच्छिंद्र राठोड (वय १४, रा. हनुमंतखेडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. जळगाव जिल्ह्याची हद्द आणि मराठवाड्यातील पायथ्याशी असलेल्या सोयगाव तालुक्यातील बोरमाळतांडा येथील शिवारात हि घटना घडली आहे. शेतात अजय राठोड व अश्विनी राठोड शेतात काम करीत होते.
दरम्यान सोमवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान (Lightning Strike) वीज कडाडून पडली. यात अजय व अश्विनी या दोघांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सोयगाव तालुक्यातील बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.