अकोल्यात सोयाबीन सात हजारांवर; सोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल Saam Tv
ऍग्रो वन

अकोल्यात सोयाबीन सात हजारांवर; सोयाबीनची विक्रमी दराकडे वाटचाल

गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. अकोल्यातील बाजारात सोयाबीनच्या दराने प्रति क्विंटल आज 7 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.

अॅड. जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला: गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. अकोल्यातील बाजारात सोयाबीनच्या दराने प्रति क्विंटल आज 7 हजाराचा टप्पा ओलांडला आहे.अकोल्यातील बाजार समिती मध्ये आज सोयाबीनला 7 हजार 25 रुपये इतका दर मिळाला आहे.

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोयाबीनची 522 क्विंटल आवक झाली. यामध्ये सोयाबीनला कमीत कमी 5885 तर जास्तीत जास्त 7025 रुपये दर मिळाला असल्याने सोयाबीन पुन्हा एकदा विक्रमी भावाकडे वाटचाल करताना दिसत आहे. शासनाने सोयाबीनला केवळ 3950 रुपये हमीभाव जाहीर केला असतांना खुल्या बाजारात सोयाबीन उच्चांकी दराकडे वाटचाल करत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी, जिल्ह्यात सोयाबीन काढणीवर असतानाच अवकाळी पावसाचा या पिकाला फटका बसल्याने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर याही वर्षी सुरुवातीला आलेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबिन सह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापसाने भावात दहा हजारी ओलांडली असताना सोयाबीन ही पुन्हा विक्रमी भावाकडे वाटचाल करताना दिसत आहे.

त्यामुळे आधीच नुकसान झालेल्या पिकांना भावातून दिलासा मिळत आहे. उत्पादनात घट झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते. सोयाबीनची मागणी होत असल्याने देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली. याचा परिणाम विदभार्तील बाजारात दिसून येऊ लागला आहे. अकोला जिल्ह्यातील बाजारातही सोयाबीनच्या दराने उच्चांक, 7 हजार 75 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत सोयाबीन विक्रमी दर गाठण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या अनुभवा ॲक्शनचा धमाका; 'Kanguva' आता ओटीटीवर, कधी अन् कुठे पाहाल

Wedding Rituals Varmala Cermony: लग्नात वर-वधूला वरमाला का घालतात? नेमकं कारण काय, जाणून घ्या...

हे आहेत डोके आणि मानेचे प्रमुख कर्करोग, प्रतिबंधासाठी जीवनशैलीत करा हे बदल...

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT