amravati, rain saam tv
ऍग्रो वन

Amravati : अमरावतीत १ लाख ९९ हजार हेक्टर शेतीचं नुकसान; संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 250 काेटींचा फटका

अमरावतीत ओल्या दुष्काळाच सावट पसरलं आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Amravati Rain : अमरावती (Amravati) जिल्ह्यात झालेल्या पावसामुळं तसेच अतिवृष्टीमुऴं शेतक-यांसह संत्रा उत्पादकांना माेठा आर्थिक फटका बसला आहे. जिल्हा कृषी विभागानं जूलै महिन्याच्या केलेल्या प्राथमिक अहवालात संत्रा उत्पादक शेतक-यांना सुमारे दाेनशे पन्नास काेटींचा आर्थिक फटका बसला आहे.

जुलै महिन्यात अमरावती जिल्ह्यात सततच्या पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्हा कृषी विभागाच्या प्राथमिक अहवाला नुसार सोयाबीन, कपाशी,तूर व उर्वरित पिकांचे १ लाख ९९ हजार हेक्टर नुकसान झाले होते. यात ५० हजार हेक्टरवर अमरावतीत दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली. जुलै महिन्यातील ८५ टक्के नुकसानीचे पंचनामे झाले असताना पुन्हा दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे पुन्हा राहिलेले पिके उध्वस्त झाली आहेत.

संत्रा पट्टा असलेल्या वरुड -मोर्शी भागात अतिवृष्टीमुळे व पूरस्थितीमुळे संत्रा पूर्णपणे गळून पडला आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे संत्रा बागांना मोठा फटका बसला. पावसामुळे वरुड-मोर्शीसह आदी तालुक्यातील संत्रा गळला. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अंदाजे 250 कोटींचा फटका बसला आहे.

आंबिया बहाराच्या संत्राचा शेतात सडा पडला. संत्रा उत्पादक शेतकरी यंदाही अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात अजून दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सोयाबीन, तूर कपाशी पूर्णपणे सडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अमरावतीत ओल्या दुष्काळाच सावट पसरलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पक्ष बदलणाऱ्यांना बसणार दणका; 'आयाराम गयाराम नेत्यांना होणार शिक्षा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Petrol Disel Rate: पेट्रोल ७ रुपये तर डिझेल २५ रुपयांनी महागलं; या कंपनीने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितने नेसली 1,65,200 रुपयांची साडी

SCROLL FOR NEXT