Onion
Onion अभिजित सोनावणे
ऍग्रो वन

कांद्याने केला वांदा! भाव कमी झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडलेत. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या लासलगावमध्ये कांद्याला किलोला अवघा ४ ते ९ रुपये भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळय.

कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा वांदा केलाय. कारण लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील अन्य बाजारपेठांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झालीय. मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याच्या दर सातत्याने घसरतायत. लासलगाव बाजारसमितीत कांद्याला अवघे ४ ते ९ रुपये प्रतीकिलो दर मिळतोय.

या दरात उत्पादन खर्च तर सोडाच वाहतूक खर्चही वसूल होत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत. अवकाळीचा तडाखा, त्यात सध्या वाढतं तापमान, विजेचं भारनियमन, पाणीटंचाई यामुळे कांदा पीक आधीच अडचणीत आलेले असताना बाजारात कांद्याचे दरही घसरल्याने बळीराजा हवालदिल झालाय.

- कांदा पिकासाठी एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो.

- मागील वर्षी अवकाळीचा तडाखा, हवामान बदल यामुळे शेतकऱ्यांना दुबार तिबार पेरणी करावी लागल्यानं उत्पादन खर्च वाढलाय

लासलगाव बाजारसमितीतील कांद्याचे दर-

उन्हाळ कांदा ( प्रति क्विंटल दर )

किमान कमाल सरासरी

४५१ रुपये १३८२ रुपये ९५१ रुपये

हे देखील पाहा-

कांद्याला मिळणारा बेभरवशाचा बाजारभाव, बदलत्या हवामानाचा फटका यामुळे गेल्या काही वर्षांपासून कांदा शेती आत बट्ट्याची बनत चाललीय. त्यामुळे कांद्याला हमीभाव द्यावा, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांकडून केली जातेय. या प्रश्नावरून दरवर्षी शेतकरी आंदोलनं तसच मोठा गदारोळ देखील होतो. यंदाही शेतकऱ्यांनी कांद्याला प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान आणि किमान आधारभूत किंमतीची मागणी केलीय. त्यामुळे कांद्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार पातळीवरूनही प्रयत्न होणे गरजेच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT