कांदा उत्पादक शेतकरी संकटात; कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी... Saam Tv
ऍग्रो वन

कांदा उत्पादक शेतकरी संकटात; कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी...

वातावरणातील बदलाने कांद्याची वाढच झाली नाही, आणि दुसरीकडे भावही नाही...

संजय जाधव

बुलढाणा - गेल्या आठवड्यामध्ये समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यभरात विविध ठिकाणी तुरळक तर कुठे मुसळधार पाऊस झाला आहे. याचाच परिणाम म्हणून बुलढाणा जिल्ह्यात वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला, हरभरा आणि तुरीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखील आता कांद्याने पाणी आणल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वच पिके घेणारे शेतकरी संकटात सापडले आहेत.

हे देखील पहा -

बुलडाणा जिल्ह्यामध्ये कांद्याचे पीक देखील प्रामुख्याने घेतले जाते आणि खरीप हंगामा मध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या नुकसानाची घट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली. मात्र कांद्याची जमिनीत वाढ झाली नसल्याने उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर दुसरीकडे या कांद्याला आता मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचा यामधून लावलेला खर्चही निघत नाही आहे.

नांद्राकोळी येथील शेतकऱ्याने आपल्या एक एकरामध्ये चार किलो कांदा बियाण्याची पेरणी केली. मशागत केल्यानंतर हा कांदा काढला जातो, कांद्याची पेरणी केल्यापासून ते कांदा काढणीपर्यंत शेतकऱ्याला एकरी 60 हजार रुपयांच्या जवळपास खर्च आला आहे. यातून उत्पन्न हे केवळ 30 ते 35 हजार रुपये होणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कांद्याला चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली. मात्र आता भाव झपाट्याने कमी झाल्याने या शेतकऱ्याच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणल्याचे दिसून येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT