Onion saam tv
ऍग्रो वन

Onion: राज्यात कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावं; शेतकरी संघटनेची मागणी

नाशिकबरोबरच जिल्ह्यात आणि राज्यात इतर भागामध्ये कांद्याचे (Onion) मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: नाशिकबरोबरच जिल्ह्यात आणि राज्यात इतर भागामध्ये कांद्याचे (Onion) मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात असते. कांद्याच्या (Onion) भावात सतत चढ- उतार होत असल्यामुळे याचा शेतकऱ्यांना (farmers) मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यामध्ये रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. यामुळे वाढीव उत्पादनाचा अंदाज घेत शासनाने (government) कांदा निर्यातीच्या धोरणाला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून (farmers) केली जात आहे. पुढील २ महिन्यानंतर नाफेडने जास्तीत- जास्त कांद्याची वाजवी दरात खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेनी यावेळी केली आहे.

हे देखील पहा-

या दरम्यान, कांदा लागवड ते साठवणूक, विक्री व्यवस्थापन यामध्ये उत्पादकाच्या समोर विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वीज, पाणी, इंध दरवाढ, खतांच्या भावात वाढ होत असल्याने किंमती याचा मोठा फटका शेतकऱ्यांना (farmers) बसत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. ज्यावेळी कांद्याचे भाव वाढत असतात. तेव्हा सरकारकडून (government) भाव कमी करण्यासाठी हालचाली केले जात असतात.

कांद्याच्या भावात घसरण होत असताना राज्य किंवा केंद्र सरकारकडून (Central Government) कोणत्याही हालचाल होत नाही. सरकार याविषयी काहीच भूमिका घेत नाही. देशाला कांदा पुरवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातून (Maharashtra) केले जात असते. मात्र, कांद्याला भाव वाढला की त्याचे भाव पाडण्याचे काम केले जात असते. भाव वाढले की, कांदा आयात (Import) करुन भाव पाडले जात असतात असे शेतकऱ्यांचे मत आहे. सरकारने जास्तीत- जास्त कांदा निर्यात करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे संघटनेचे मत आहे.

सध्या नाशिक (Nashik) मधील बाजारपेठांमध्ये कांद्याला १३ ते १४ रुपयांचा प्रतिकिलोला भाव मिळत आहे. या भावातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. यामुळे कांद्याला प्रतिकिलो ३० रुपयांचा भाव मिळावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. राज्यात नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जात असते. याविषयी आम्ही लवकरच सरकारला अधिकृत निवेदन देणार असल्याचे शेतकरी संघटनेनी यावेळी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टानं गोहत्या बंदीचा निर्णय बदलला; सरकारकडून नोटीस जारी

Maharashtra News Live Update: पेरलेले सोयाबीन न उगवल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांची एसडीओ कार्यालयावर धडक

Nashik Fort : ४,८२९ फूट उंचीवर वसलेले नाशिकमधील ऐतिहासिक ठिकाण, किल्ल्यावरून दिसणारे विहंगम दृश्य मन जिंकून घेईल

Badlapur Tourism: हिरव्यागार टेकडीवर वसलंय शिवकालीन जागृत खंडोबा मंदिर; भाविकांसाठी श्रद्धेचं अनोखं स्थान

Monsoon AC Tips: पावसाळ्यात AC किती डिग्रीवर चालवल्यावर बील अर्धे येईल? ही ट्रिक वापरा

SCROLL FOR NEXT