onion auction resumes in lasalgaon krushi utpanna bazar samiti from today saam tv
ऍग्रो वन

Nashik : तब्बल 12 दिवसांनंतर नाशकातील लासलगाव बाजार समितीत कांदा लिलावास प्रारंभ, जाणून घ्या दर

Lasalgaon Krushi Utpanna Bazar Samiti: बाजार समित्या बंद असल्याने जिल्हा निबंधकांनी बाजार समितीला व्यापाऱ्यांना नोटिसा बाजावण्याचे आदेश दिले. नवीन व्यापाऱ्यांना परवाना द्यावा असे सुचवले. त्यानुसार लासलगाव बाजार समिती सुरू झाली.

Siddharth Latkar

- अजय साेनवणे

Nashik :

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणा-या लासलगाव बाजार समितीत आजपासून (शुक्रवार) कांद्याचे लिलाव पुन्हा सुरु झाले आहेत. गेल्या बारा दिवसांपासून साप्ताहिक सुट्ट्या, व्यापा-यांचा मार्च एन्ड व त्यानंतर हमाल-मापारी यांनी पुकारलेला बंद यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लिलाव ठप्प झाले होते. त्यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला हाेता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीत मध्ये कांद्याचे लिलाव बंद हाेेते. नो वर्क नो वेजेस आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतक-यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली होती. (Maharashtra News)

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्या वेगवेगळ्या कारणास्तव गेल्या 12 दिवसांपासून बंद राहिल्या. त्यामुळे बाजार समित्यांचे 100 कोटी पेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे.

लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव झाले सुरु झाले असून विंचूरसह लासलगावचे इतर नवीन व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेऊन कांदा खरेदी केली. आज कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1550 रुपये इतका भाव मिळाला आहे.

लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी मनमाड, नांदगावंसह इतर बाजार समित्या अजूनही बंद असल्यामुळे त्यासुरु करण्यासाठी शासनाने व्यापाऱ्यां विरुद्ध कडक भूमिका घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fuel Crisis: राज्यात इंधन टंचाईचा भडका, पेट्रोल- डिझेलसाठी हाणामारी

Petrol-Diesel Price Hike: इंधनटंचाईतही दरवाढीचे चटके, गृहखर्चाचं बजेट कोलमडलं; सर्वसामान्य नागरिक चिंतेत

MHT-CET गुणवत्ता यादीत घोटाळा झाल्याचा आरोप; राज्य सीईटी सेलने स्पष्टीकरण देताना काय म्हटलं?

कांदा उत्पादकांचे कष्ट मातीमोल; कांद्याला फक्त सव्वा रुपया भाव, VIDEO

Ranveer Singh: बॉलिवूडमध्ये रणवीर सिंहवर बंदी? चित्रपट संघटनेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT