नववर्षाच्या पुर्वसंध्येला पांढरं सोनं चकाकलं; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण... Saam Tv
ऍग्रो वन

नववर्षाच्या पुर्वसंध्येला पांढरं सोनं चकाकलं; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण...

अकोल्यातील अकोट बाजार समितीत मध्ये कापसाला 9 हजार 700 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अकोट तालुक्यात कापसाचे दर चांगलेच वधारले आहेत.

अॅड. जयेश गावंडे

अकोला: कॉटन सिटी म्हणून ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यात नववर्षाच्या पुर्वसंध्येला कापसाला उच्चांकी दर मिळालाय. अकोल्यातील अकोट बाजार समितीत मध्ये कापसाला 9 हजार 700 रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचे वातावरण पसरले आहे. अकोट तालुक्यात कापसाचे दर चांगलेच वधारले आहेत. दरम्यान, नव्या वर्षात रुईखंडीचे भाव महाराष्ट्रात वाढल्यास कापसाचे (cotton crop) भावसुद्धा दहा हजारांचा टप्पा पार करणार असल्याचे संकेत आहेत.

हे देखील पहा -

अकोला (Akola) जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी नगदी पीक म्हणून कापसाचे उत्पादन घेतो. मात्र, गेल्या काही वर्षात गुलाबी बोंडअळी, पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी, दुष्काळ इत्यादी कारणांमुळे महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात घट जाणवत होती. त्याचा परिणाम देशाच्या एकत्रित कापूस उत्पादनावरही पडला. दरवर्षी विविध संकटांमुळे व नुकसानामुळे कापूस लागवडीवरही परिणाम झाला. त्यामुळे महाराष्ट्रात यावर्षी खरिपात गेल्या वर्षी पेक्षा दोन लाख 83 हजार 799 हेक्टर कापूस लागवड क्षेत्र घटले असून, सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 94 टक्के क्षेत्रावर म्हणजे 39 लाख 41 हजार 464 हेक्टरवर यावर्षी कापूस लागवड करण्यात आली आहे. आदी कारणांमुळे चालू वर्षी भारतात कापसाचे दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक करण्याची शक्यता आहे.

कापसाच्या भावात होत असलेली भाववाढ त्यामुळे शेतकऱ्यांचं पांढरं सोनं आणखी चकाकणार असल्याची शक्यता आहे. अकोट बाजार समितीमध्ये आज चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणखी पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं हे पांढरं सोन्याला 2022 मध्ये आणखी चकाकी येऊ दे ही अपेक्षा.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT