Nashik Rain Saam tv
ऍग्रो वन

Nashik Rain : काढणीला आलेला कांदा सडला; परतीच्या पावसाने कांद्यासह मक्याचे नुकसान

Nashik News : नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलेच धुमशान घातले आहे. सलग तीन दिवस झालेल्या जोरदार पाऊस झाला. या पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : राज्यात होत असलेल्या परतीच्या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात देखील जोरदार पाऊस झाला. सलग तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे कांदा आणि मका पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने काढणीला आलेला कांदा शेतात साचलेल्या पाण्यामुळे सडला आहे. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलेच धुमशान घातले आहे. सलग तीन दिवस झालेल्या जोरदार पाऊस झाला. या पावसाने मात्र शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः काढणीला आलेल्या कांद्याला तसेच मक्याला त्याचा फटका बसला असून चांदवड तालुक्यातील पूर्व भागात शेतकऱ्यांचा काढणीला आलेला कांदा पूर्णतः पाण्यात भिजला आहे. शेतातील पाणी अद्याप जिरलेले नसल्याने कांदा सडून त्याला वास येऊ लागला आहे. तर शेतात जाताना पाय खोलवर जात असल्याने (Onion Crop) कांदा तसाच सोडून देण्याची वेळ आली आहे. 

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागल्याने आता अधिकारी पंचनामे करायला येऊ शकत नसल्याचे शेतकरी सांगताय. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Chips Recipe: घरच्या घरी मुलांसाठी बनवा पौष्टिक बीटरुट चिप्स

Tejpatta Tea Benefits: तमालपत्राचा चहा पिण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे!

Baramati News : बारामतीचा वाली कोण? अजित पवारांचं मोठं विधान, पाहा Video

Priyanka Gandhi : जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक; प्रियंका गांधींचे PM मोदींना ओपन चॅलेंज

Walnut: दूध की पाणी? अक्रोड कशात भिजवून खाणे जास्त फायदेशीर

SCROLL FOR NEXT