Onion Price Saam tv
ऍग्रो वन

Onion Price : कांदाच रडू लागला! दर घसरले; नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत क्विंटलला किती भाव?

Nashik News : नैसर्गिक संकटामुळे कांद्याचे उत्पादन आधीच घटले आहे पावसाळ्यात लागवड करण्यात आलेला लाल कांदा काढणी करण्यात आली. सुरवातीला कांद्याला चांगला भाव मिळत होता. मात्र काही दिवसांपासून भाव खाली येऊ लागले.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : मागील महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळत होता. भाव चांगला असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होत होता. मात्र मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत असून मागील पंधरा दिवसात कांद्याचे दर निम्म्याहून खाली घसरल्याचे चित्र नाशिक जिल्ह्यातील बाजार समितींमध्ये पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. 

पावसाळ्यात लागवड करण्यात आलेला लाल कांदा काढणी करण्यात आली. सुरवातीला कांद्याला चांगला भाव मिळत होता. मात्र काही दिवसांपासून भाव खाली येऊ लागले. अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटामुळे कांद्याचे उत्पादन आधीच घटले आहे. त्यात भाव देखील पडल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या बाजारात येणाऱ्या लाल कांद्याची टिकवण क्षमता अवघ्या काही दिवसांचीच असल्याने कवडीमोल भावात कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

भाव आले निम्म्यावर 

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव सध्या निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे ९ डिसेंबरला बाजारात असणारा कांद्याचा ३ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल सरासरी भाव मिळत होता. आज २४ डिसेंबरला हे दर १ हजार ६०० ते १ हजार ७०० रुपयांपर्यंत घसरला आहे. कांद्याचे भाव पडल्याने दररोज कोट्यावधींचे नुकसान सहन करण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. 

२० टक्के निर्यात शुल्क हटवा 
कांद्याचे भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अर्थात मिळेल त्या दरात कांदा विक्री करावा लागत आहे. यामुळे सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क तातडीने हटवावं आणि कांद्याला कायमस्वरूपी चांगला भाव मिळेल, यासाठी उपाययोजना कराव्यात; अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Medha Rana: बॉर्डर २ मध्ये झळकणारी मेधा राणा कोण? जाणून घ्या

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT