Grapes Farming Saam tv
ऍग्रो वन

Grapes Farming : सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांवर रोगांचा प्रादुर्भाव; उत्पादक शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा

Nashik News : सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेवर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव, द्राक्षांच्या हंगामामध्ये उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी संकटात सापडला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

नाशिक : मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. यात नाशिक जिल्ह्यात अधिक पाऊस झाला असून याचा परिणाम द्राक्ष बागांवर होऊ लागला आहे. सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. रोगराई कमी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागडी औषधी घेऊन फवारणी केली जात आहे. 

द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले आहे. यामुळे द्राक्ष बागेच्या मूळ्या चोकप झाल्याने द्राक्ष बागेवरील फांद्यांवर मूळ्या बाहेर आल्या आहेत. तर द्राक्ष बागेवर सततच्या पावसामुळे करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.  

उत्पादनात घट होण्याची शक्यता 

रोगराई वाढत चालली असल्याने द्राक्ष उत्पादकांना अतिरिक्त औषध फवारणीचा खर्च येत असल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. तर येणाऱ्या द्राक्षांच्या हंगामामध्ये उत्पादन घटनेची भीती व्यक्त केली जात आहे. उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाल्याने उत्पादन खर्च निघेल किंवा नाही ही सुद्धा शाश्वती राहिली नसल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील गवळी सांगत आहे.  

भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान पाण्याखाली
भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पाण्याखाली बुडालेले आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची शेती करत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच धानाच्या पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांचे रोवणी झालेले धान सुद्धा वाहून गेले आहेत. अनेक धुरे वाहून गेले आहेत. त्यांची तलाठी विभागाकडून चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dadar Kabutar khana : दादर कबूतरखान्यावरून 'फडफड' सुरुच; जैन मुनींचा शस्त्र उचलण्याचा इशारा, कोर्टालाही उघड धमकी? VIDEO

Ind vs Pak : पाकिस्तानला मोठा फटका, भारताशी पंगा घेतल्याने पाकड्यांचे १२४० कोटींचे नुकसान

Malvan Tourism : मालवणजवळ लपलाय 'हा' बीच, पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरण्याची मजा वेगळीच

Child Development : लहान मुलांना मारल्याने ओरडल्याने काय परिणाम होतो?

Metro In Dino Ott Release: पंकज त्रिपाठींचा मेट्रो इन दिनो लवकरच होणार या ओटीटीवर प्रदर्शित; थिएटरनंतर आता ओटीटीही गाजवणार

SCROLL FOR NEXT