Nashik News Saam tv
ऍग्रो वन

Nashik News : रानडुकरांचा हैदोस; २० एकरात टाकलेले मका बियाणांचे केले नुकसान

Nashik News : नाशिकच्या येवला तालूक्यातील कातरणी परिसरात पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मक्याची महागडी बियाणे आणत पेरणी केली

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. यंदाच्या हंगामात मक्याची लागवड बऱ्यापैकी झाली असून जमिनीत टाकलेले बियाणांचे देखील नुकसान होत अणे. यात लागवड केलेल्या मक्याला कोंब आले असताना रानडुक्करांनी हे कोंब जमिनीतून उकरून काढले आहेत. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. 

नाशिकच्या (Nashik) येवला तालूक्यातील कातरणी परिसरात पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मक्याची महागडी बियाणे आणत पेरणी केली. मक्याला कोंब फुटलेले असताना रात्रीच्या सुमारास टोळधाडीच्या रूपात आलेल्या रानडुकरांच्या कळपाने संपुर्ण २० एकरातील मक्याचे कोंब खाऊन पिक नुकसान केल्याचा प्रकार उघडीस आले आहे. रानडुक्करांमुळे परिसरातील (Farmer) शेतकरी त्रस्त झाले असून त्यांनी रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वनविभागाकडे केली. 

रानडुकरांनी केलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रानडुकरांनी केलेल्या नुकसानीची भरपाई मिळावी; अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. असाच प्रकार नांदगाव तालूक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या माळेगाव येथे घडल्याच समोर आले असून तेथिल शेतकऱ्यांनी वन विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील रिगालिया रेसिडेन्सी सोसायटीच्या तत्कालीन समितीवर कारवाई; १३ सदस्य ५ वर्षांसाठी अपात्र

SIR : काही गडबड आढळली तर संपूर्ण प्रक्रिया रद्द करू; 'एसआयआर'बाबत सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?

Navratri 2025: नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील नकारात्मक वस्तू काढा, नाहीतर येतील अनेक अडथळे

Vastu Tips For Money: घरात कासवाची मूर्ती ठेवल्याने कोणते लाभ होतात?

Pulao Recipe : साहित्य कमी मात्र रेसिपी चवदार, झटपट बनवा 'हा' चटपटीत पुलाव

SCROLL FOR NEXT