नंदुरबार : हजारो वनहक्क दावेदारांचा आपल्या मागण्यांसाठी पायी मोर्चा
नंदुरबार : हजारो वनहक्क दावेदारांचा आपल्या मागण्यांसाठी पायी मोर्चा SaamTvNews
ऍग्रो वन

नंदुरबार : हजारो वनहक्क दावेदारांचा आपल्या मागण्यांसाठी पायी मोर्चा

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार : नवापुर तालुक्यातील जवळपास पाच हजार पेक्षा अधिक वन हक्क दावेदार शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विसरवाडी ते नंदुरबार पन्नास किलोमीटर लांब पायी मोर्चाला सुरुवात केली आहे. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा शेतकरी संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला आहे.

हे देखील पहा :

नंदुरबार जिल्हा अधिकारी व प्रांताधिकारी यांना गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेसाठी निवेदन देऊन वेळ मागितली. परंतू, वन हक्क दावेदारांच्या मागण्यांवर चर्चा व समस्या सोडवण्यासाठी वेळ दिला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी विसरवाडी ते नंदुरबार पन्नास किलोमीटर लांब अंतर पायी चालत मोर्चाला सुरुवात केली आहे, आज नवापुर तालुक्यातील शेवटचे गाव असणाऱ्या बिजगाव येथे मोर्चेकरी मुक्काम करणार असून उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वन हक्क दावेदार शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार आहे.

वन हक्क दावेदारांची प्रमुख मागणी आदिवासी वनहक्क कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी करून सर्व दाखल दावेदारांना सातबारा उतारा मिळावा व स्थळ पाहणीच्या आधारे त्यांना पात्र करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हजारोंच्या संख्येने असलेला पायी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

गेल्या 15 वर्षापासून वन हक्क कायद्याची योग्य रीतीने अंमलबजावणी झालेली नाही गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात कोरोनाचा धाक दाखवून घरात कोंडून सर्वात जास्त वन हक्क दावेदारांचे निकाल अपात्र ठरवले आहे. जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी चर्चेला ही वेळ देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

SCROLL FOR NEXT