- राजेश भोस्तेकर
रायगड : रायगडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही विनामास्क जिल्ह्यात फिरत असाल तर आता पोलीस तुमच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत. विना मास्क (Without Mask) फिरणाऱ्यावर केसेस करू नका असे आदेश रायगड (Raigad) जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक याच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी यांना पत्र जारी केले आहे. त्यामुळे रायगडकरांसह पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे.
हे देखील पहा :
मार्च 2020 पासून कोरोना (Corona) महामारीने डोके वर काढले. त्यानंतर मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझर लावणे, गर्दी टाळणे हे नियम बंधनकारक केले होते. कोरोना प्रादुर्भाव असल्याने विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून (Police) दंडात्मक कारवाई केसेस होऊ लागल्या. त्यामुळे पकडणाऱ्या नागरिकांच्या खिशाला आर्थिक फटका बसत होता. त्यामुळे नागरिक मास्क लावूनच बाहेर पडत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव हा रायगडात कमी झाला आहे. जिल्ह्यात लसीकरण प्रमाणही 92 टाक्याच्या वर असल्याने कोरोना आटोक्यात आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई करू नका असे पत्र रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयास देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विनामास्क केसेस बंद करण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने आता रायगड पोलीस हद्दीत विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाई केसेस करू नका असे पत्र सर्व पोलीस ठाण्यात आणि वाहतूक शाखाना दिले आहे. पोलिसांच्या या आदेशामुळे रायगडकरांना मास्क पासून मुक्ती मिळणार आहे हे मात्र नक्की.
Edited By : Krusharav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.