सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपलं होतं. त्यातच अतिवृष्टीमुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झालं होते. मात्र ते नुकसान टळल्यानंतर शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट उभे राहिले असून शेकडो हेक्टर पिकावर अळीचा प्रादुर्भाव पडलेला पाहण्यास मिळत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेले होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने जेमतेम आता उघडीप दिली असून आता पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव पडलेला पाहण्यास मिळत आहे. प्रामुख्याने (Soyabean Crop) सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव पडला असून यासाठी शेतकरी आता फवारणी करू लागला आहे. मात्र अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्याने तो लवकर नियंत्रणात येत नसल्याचे दिसत आहे.
शेतकरी संकटात
नंदुरबार जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून शेकडो हेक्टर सोयाबीन पिकावर अडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता असून सोयाबीन पिकावर केलेल्या हजारो रुपयांचा खर्च वाया जातो की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असल्याने शेतकऱ्यांपुढे आता नव संकट उभा राहिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.