Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसाने हाहाकार; अनेक घरांमध्ये शिरले पाणी, ७ दुचाकी गेल्या वाहून; दुकाने, स्कुल बस पुराच्या पाण्यात VIDEO

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे
Hingoli Heavy Rain
Hingoli Heavy Rain Saam tv
Published On

हिंगोली : हिंगोलीत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अचानक ओढे नाले व नद्यांना पूर आल्याने जिल्ह्याला पूर परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. नद्यांना पूर आल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शिरले असून अनेक घरात पाणी शिरले आहे. तर शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या स्कुल बस देखील अर्ध्या बुडाल्या आहेत. तर हिंगोलीच्या लाचलुचपत कार्यालयात पुराचे पाणी शिरले असून कार्यालयात गुडघाभर पाणी साचले आहे. 

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्याच्या दबावाने ईसापुर व खानापूर येथील पुलाला मोठे भगदाड पडले आहे, खानापूर जवळील पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. तर ईसापुर गावाच्या जवळ असलेल्या ओढ्याला देखील भेगा पडल्या आहेत. यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Hingoli Heavy Rain
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी आता यापुढेही नोंदणी करता येणार, पण.... शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी सांगितली महत्वाची अपडेट

घरात, मार्केट परिसरात पुराचे पाणी  

हिंगोलीच्या कळमनुरी शहरात पुराचे पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे संसार उपयोगी साहित्य व नागरिकांनी साठवणूक केलेले धान्य देखील यामध्ये नष्ट झाले आहे. तर हिंगोली शहरातील लोटस सुपर मार्केट,अंबिका ट्रेडर्स एजन्सी  यासह दहा ते बारा दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर या पुरात सात दुचाकी वाहून गेल्या आहेत. खाजगी स्कूल व्हॅन देखील पुराच्या पाण्यात बुडत आहेत. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com