Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Solapur News : उसनवारीने दिलेले पैसे परत मागितले. या कारणावरून आरोपींनी मारहाण केली. यावेळी फैसल सालार याने 'मै इधर का भाई हू, कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा' असे म्हणून चाकूने चाकू खुपसून ठार मारण्याचा प्रयत्न
Solapur Police
Solapur PoliceSaam tv
Published On

सोलापूर : आर्थिक फायद्यासाठी परिसरात वर्चस्व कायम राखण्यासाठी हिंसाचाराचा वापर करून खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, जिवे ठार मारण्याची धमकी देणे यासारखे ७ दखलपात्र गुन्हे दाखल असलेल्या सालार गँगवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर पोलिसांनी मागील वर्षभरात मोक्का अंतर्गत तिसरी कारवाई करण्यात आली आहे. 

सोलापुरातील नई जिंदगीमधील मौलाना आझाद चौकात २ जुलैला दुपारी सोहेल रमजान सय्यद यांनी आरोपींना उसनवारीने दिलेले पैसे परत मागितले होते. या कारणावरून आरोपींनी त्यांना मारहाण केली. यावेळी फैसल सालार याने 'मै इधर का भाई हू, कोई आगे आया तो उसे खल्लास कर दूंगा' असे म्हणून चाकूच्या साहाय्याने धमकावत सोहेलच्या पोटात चाकू खुपसून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत, फिर्यादीने फैसल सालार, जाफर शेटे, टिपू सालार, पापड्या, अक्रम पैलवान आणि त्यांच्यासोबत असलेल्या ३ ते ४ जणांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला.

Solapur Police
Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

टोळीविरुद्ध मोकांतर्गत कारवाई 

सर्व आरोपी एकाच टोळीचे सदस्य असल्याने त्यांच्यावर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सालार टोळीविरुद्ध मोकाअंतर्गत कारवाई केली. यात फैसल अब्दुल रहीम सालार, जाफर महम्मद युसूफ शेटे, सईद ऊर्फ टिपू अब्दुल रहीम सालार, अनिस अहमद ऊर्फ पापड्या रियाज रंगरेज, अक्रम ऊर्फ पैलवान कय्युम सातखेड आणि वसीम ऊर्फ मुकरी अब्दुल रहीम सालार यांच्यासह अन्य चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

Solapur Police
Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

तिसरी कारवाई 

दरम्यान, सोलापूर शहरातील टोळ्यांची गुन्हेगारी संपावी; यासाठी पोलिस आयुक्त एम. राजकुमार हे प्रत्येक गुन्ह्यात लक्ष देत आहेत. या वर्षातील मोक्काअंतर्गत असलेली तिसरी कारवाई आहे. यात बसण्णा शिंदे आणि त्याचे दोन साथीदार यांच्यावर पहिली मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर चोरी, दरोडा, हाणामारी, रॉबरी असे गंभीर गुन्हे होते. तर अहिल्यानगर येथील राजेंद्र ऊर्फ पप्पू चव्हाण याच्या चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीवर मोक्का लावण्यात आला. त्यानंतर आता सालार गँगवर मोक्का लावण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com