agricultural laws 
ऍग्रो वन

कृषी कायदे रद्द करण्याचे स्वागत; नवापूरमध्‍ये फटाके फोडून जल्‍लोष

कृषी कायदे रद्द करण्याचे स्वागत; नवापूरमध्‍ये फटाके फोडून जल्‍लोष

दिनू गावित

नंदुरबार : विविध शेतकरी संघटनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे रद्द करण्याचे स्वागत केले. नवापूरमध्ये सत्यशोधक शेतकरी संघटनेतर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. (nandurbar-news-repeal-of-agricultural-laws-Firecrackers-explode-in-Navapur)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारद्वारे पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करणार असल्याच्या वक्तव्याचे नंदुरबार जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी स्वागत करून जल्लोष केला. नवापूर तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सत्यशोधक शेतकरी संघटनेच्यावतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या मार्गांनी शेतकऱ्यांनी विविध आंदोलन केले. गाव खेड्यापासून शेतकरी दिल्लीपर्यंत आंदोलनात सहभागी झाला होता. भांडवलदारांच्या हितासाठी केंद्र सरकारने तयार केलेले कृषी कायदे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्द करणार असल्याचे वक्तव्यानंतर शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला.

तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

खऱ्या अर्थाने हा शेतकऱ्यांचा विजय आहे. जोपर्यंत संसदेमध्ये या कायद्यांबाबत चर्चा होऊन रद्द होत नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. तर लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने संपूर्ण खानदेशात ठिकाणी जल्लोष करण्यात आला. लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने दिल्ली येथे शेतकरी आंदोलनात सहभागीसाठी गेलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील सीताबाई तडवी यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे बलिदान व्यर्थ ठरले नसून शेतकऱ्यांचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला किती कोटी मिळणार? उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: भोंदू खरातच्या कबुलीनंतर शिवनिका संस्थानचे सचिव नामकर्ण आवारेला अटक

BP - Diabetes : कडक उन्हामुळे वाढते BP अन् शुगर; कुणाला सर्वाधिक धोका?

NEET परीक्षा कधी जाहीर होणार? महत्त्वाची अपडेट समोर

Aadhaar Card Update: मोठी बातमी! आधार बनवण्यासाठी 'हे' डॉक्यूमेंट्स आवश्यक, नवे नियम लागू, पण कोणते? वाचा...

SCROLL FOR NEXT