Nandurbar Rain Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar Rain : परतीच्या पावसाने शेतात ३ फुटांपर्यंत पाणी; पांढर सोनं झालं मातीमोल!

Nandurbar News : आठवडाभरापूर्वी आलेला परतीचा पाऊस अजून देखील गेलेला नाही. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. या परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस होत असल्याने शेतात ३ फुटांपर्यंत पाणी साचल्याने पांढर सोन मातीमोल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

आठवडाभरापूर्वी आलेला परतीचा पाऊस (Rain) अजून देखील गेलेला नाही. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. या पावसानं शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मका खुडून ठेवला आहे. तर कापूस वेचणीला देखील सुरवात करणार होते. मात्र पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्याचे नियोजन बिघडले असून कापूस वेचणी करता येत नसल्याने बोन्ड काळवंडली आहेत. 

दरम्यान नंदुरबार तालक्यातील सैताने गावात शेकडो हेक्टर कापूस पिकाचे नुकसान झाले आहेत. यात कापसाच्या शेतात अगदी गुडघाभर पाणी साचले असल्याने संपूर्ण कापूस पाण्यात आहेत. यामुळे झाडावरील बोन्ड खराब झाले आहे. तर कैरी देखील सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशी परिस्थिती असताना देखील कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर येत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा बांधावर येऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आवाहन केले जात असून नंदुरबार जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर न झाल्यास शेतकरी बांधव रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कर्यायावर काळ वांगण फासणारा असल्याचा इशारा दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT