Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : तीन वर्षापासून ठिबक सिंचन संचांवरील अनुदान नाही; नंदुरबारमध्ये शेतकरी आक्रमक

Nandurbar News : शासनाने जाहीर केलेल्या ठिबक सिंचन योजनेतंर्गत अनेक शेतकऱ्यानी ठिबक सिंचन संच खरेदी केले. मात्र शासनाकडून मिळणारे अनुकं मात्र शेतकऱ्यांना मिळाले नाही

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी २०२० ते २०२४ पर्यंत शेतकऱ्यांनी शासनाच्या अनुदान योजनेअंतर्गत ठिबक सिंचनची खरेदी केली होती. मात्र गेल्या चार वर्षापासून शेतकऱ्यांना ठिबक सिंचन खरेदीच्या अनुदान मिळाले नाही. या अनुदानाशिवाय दुष्काळ अनुदानापासून देखील शेतकरी वंचित असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नंदुरबारमध्ये आंदोलन छेडले आहे. 

शासनाने जाहीर केलेल्या ठिबक सिंचन योजनेतंर्गत अनेक शेतकऱ्यानी ठिबक सिंचन संच खरेदी केले. मात्र शासनाकडून मिळणारे अनुकं मात्र शेतकऱ्यांना (Farmer) मिळाले नाही. मागील तीन वर्षांपासून हि परिस्थिती असून  शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. तसेच मागील वर्षी नंदुरबार (Nandurbar) जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यात आला होता. अनेक शेतकऱ्यांना प्रशासनाच्या चुकीमुळे दुष्काळी अनुदान प्राप्त झालेले नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.  

हे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांना देण्यात यावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करत आहे. एकीकडे सरकार लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना जाहीर करत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. सरकार फक्त मतांचे राजकारण करत आहे. शेतकरी हा सरकारचा लाडका नाही का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सावंतवाडी ​मळगाव घाटात कार दरीत कोसळली ७ जण जखमी

Maharashtra MLC Election: विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस देणार उमेदवार; 'या' नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

Chhatrapati Shivaji Maharaj History: लूट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत हेच शहर का निवडलं?

सुखी संसाराच्या स्वप्नांची क्षणांत राखरांगोळी; १० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू

Crime News: सूनेने सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट ठेचला; गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू, कशावरून इतका टोकाचा वाद झाला?

SCROLL FOR NEXT