Nandurbar Chilli Market Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar Chilli Market : नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची आवक घसरली; आतापर्यंत १५ कोटीची उलाढाल

Nandurbar News : नंदुरबार बाजार समिती मिरचीच्या खरेदी विक्रीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाची आहे मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जात असून मध्यप्रदेश, गुजरातमधील शेतकरी येथे मिरची विक्रीसाठी येतात

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा ओली लाल मिरचीच्या आगार म्हणून ओळखला जात असतो. मात्र यावर्षी ओली लाल मिरचीची आवक प्रचंड घटली आहे. बाजार समितीमध्ये आतापर्यंत केवळ ५० हजार क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. त्यातून पंधरा कोटीची उलाढाल झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी मानला जात आहे.

राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्हा मानला जात असतो. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीच्या खरेदी विक्रीसाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती आहे. येथे मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जात असून मध्य प्रदेश, गुजरातमधील शेतकरी देखील येथे मिरची विक्रीसाठी येत असतात. याचमुळे नंदुरबार बाजार समितीमध्ये दररोज साधारण ३०० ते ४०० मिरची घेऊन वाहने दाखल होत असतात. यंदा मात्र चित्र वेगळे आहे. 

गेल्या वर्षाची तुलना केल्यास यावर्षी मिरचीची आवक प्रचंड घसरली असून याच्या परिणाम बाजार समितीतील उलाढालीवर झाला आहे. गेल्यावर्षी साडेतीन लाख क्विंटल पेक्षा अधिक मिरचीची आवक झाली होती. त्यातून शंभर कोटी पेक्षा अधिकची उलाढाल झाली होती. मात्र यावर्षी आवक घटल्याने उलाढाल देखील कमी झाली आहे. त्यामुळे उलाढालीच्या आकडा शेवटी कितीपर्यंत पोहोचणार असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दरम्यान लाल मिरची तोडणीला ओक्टोम्बर, नोव्हेंबरमध्ये तोडणीला सुरवात होत असते. यानंतर शेतकरी ओली लाल मिरची बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत असतात. ओल्या लाल मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने बहुतांश शेतकरी ओलीच मिरची आणतात. तर काही शेतकरी हे मिरची सुकवून विक्री करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, एकनाथ शिंदेंना धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल

Maharashtra Politics : हायकोर्टाचा निर्णय, मतमोजणी लांबणीवर; मुख्यमंत्र्यांकडूनही आयोगावर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

Wednesday Horoscope : महत्त्वाची वार्ता कानी पडणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT