Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : मार्केटमध्ये मक्याची आवकला सुरवात; दोन हजाराच्या वर मिळतोय दर

Nandurbar News : मका काढणीचे काम बहुतांश शेतकऱ्यांकडून करण्यात आले आहे. यामुळे नंदुरबार बाजार समितीमध्ये मक्याची आवकला सुरुवात झाली आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या मक्याची काढणी अनेक शेतकऱ्यांकडून पूर्ण करण्यात आली आहे. काढणी केल्यानंतर मका बाजार समितीत विक्रीसाठी आणला जात असून येथे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

मका काढणीचे काम बहुतांश शेतकऱ्यांकडून (Farmer) करण्यात आले आहे. यामुळे नंदुरबार बाजार समितीमध्ये मक्याची आवकला सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मक्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येत असते. त्यामुळे आता मक्याची काढणी सुरू झाल्याने बाजारपेठेत विक्रीसाठी मका दाखल होवू लागला आहे. यंदा (Bajar Samiti) बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मक्याला चांगला दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचीही काही अंशी भरपाई होत आहे.  

बाजार समितीत सध्या लाल मक्याला प्रतिक्विंटल १ हजार ४८१  ते २ हजार १४२ तर सफेद मका १ हजार ९६० ते २ हजार ७८० या दरात व्यापारी खरेदी करत होते. यंदाच्या हंगामातील मकाचे हे उच्च दर मिळाला असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मका विक्रीसाठी नंदुरबार बाजारपेठेत दाखल होत आहे. दरम्यान हा दर आगामी काळात देखील टिकून रहावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

अजित पवार गटात नाराजीनाट्य आहे? कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी थेटच सांगितलं

Rangoli Designs For Diwali: दिवाळीला घराच्या दाराभोवती काढा 5 सोप्या रांगोळ्या, घराची शोभा वाढेल

सावकारांची फायनान्स दुकानं लोकांनी फोडली; नांदेडमध्ये क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT